टीम इंडियाला धक्का, मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर
पुढारी ऑनलाईन : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याने बीसीसीआयला कळवले आहे की तो कौटुंबिक वैद्यकीय कारणामुळे आगामी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध होणार नाही. त्यासाठी निवड समितीने त्याच्या जागी आकाश दीप यांची निवड केली आहे. (India’s Tour of South Africa)
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तंदुरुस्त नसल्याने बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने त्याच्या सहभागाविषयी परवानगी दिलेली नाही आणि यामुळे त्याला दोन कसोटी सामन्यांमधून वगळण्यात आले आहे. यामुळे टीम इंडियाला धक्का बसला आहे. कारण, शमी अद्याप घोट्याच्या दुखापतीतून बरा झालेला नाही, असे बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे.
१७ डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे पहिला एकदिवसीय सामना झाल्यानंतर श्रेयस अय्यर कसोटी मालिकेच्या तयारीसाठी कसोटी संघात सामील होईल. तो दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी उपलब्ध नसेल, असे BCCI ने म्हटले आहे. (India’s Tour of South Africa)
भारताचा एकदिवसीय संघ : ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कॅप्टन) (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, आकाश दीप.
🚨 NEWS 🚨
Deepak Chahar withdrawn from the ODI series; Mohd. Shami ruled out of the Test series.
Details 🔽 #TeamIndia | #SAvIND https://t.co/WV86L6Cnmt pic.twitter.com/oGdSJk9KLK
— BCCI (@BCCI) December 16, 2023
The post टीम इंडियाला धक्का, मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याने बीसीसीआयला कळवले आहे की तो कौटुंबिक वैद्यकीय कारणामुळे आगामी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध होणार नाही. त्यासाठी निवड समितीने त्याच्या जागी आकाश दीप यांची निवड केली …
The post टीम इंडियाला धक्का, मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर appeared first on पुढारी.