पानशेत परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; दोन जनावरांचा फडशा
खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड पाठोपाठ पानशेत परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. परिसरात दोन जनावरांचा फडशा बिबट्याने पाडला आहे. आंबी येथे बिबट्याने बापू ढेबे यांच्या जनावरांवर हल्ला केला. त्या वेळी गाई, म्हैसींनी उलट फिरून बिबट्यावर धाव घेतली. त्यामुळे जनावरे वाचली. त्याआधी कादवे येथे लक्ष्मण ढेबे यांची एक गाय व रुळे येथील रवींद्र धोंडिबा कोकरे यांची गाय अशी दोन जनावरे बिबट्याने ठार मारली.
याबाबत पानशेत वनविभागाचे वनरक्षक मनोज महाजन म्हणाले, ’लक्ष्मण ढेबे यांच्या मृत गाईचा अद्याप शोध लागला नाही, तर रुळे येथील शेतकर्यांने वनविभागाला कळविले नाही.’ बिबट्या अथवा हिंस्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरांचा मृत्यू झाल्यास संबंधित शेतकर्यांना शासन निर्णयानुसार भरपाई देण्यात येणार असल्याचे वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे यांनी सांगितले.
वनविभागाने वनक्षेत्रासह परिसरात आवश्यक खबरदारीचे उपाययोजना सुरू कराव्यात. ठिकठिकाणी फलक लावण्याची मागणी किसान मोर्चाचे शंकरराव निवंगुणे यांनी केली आहे.
हेही वाचा
पाणी अन् रस्त्यासाठी ढमाळवाडीत नागरिकांचा आक्रोश !
Nashik News : सुधाकर बडगुजर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींनी बोलावली खासदारांची बैठक
The post पानशेत परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; दोन जनावरांचा फडशा appeared first on पुढारी.
खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड पाठोपाठ पानशेत परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. परिसरात दोन जनावरांचा फडशा बिबट्याने पाडला आहे. आंबी येथे बिबट्याने बापू ढेबे यांच्या जनावरांवर हल्ला केला. त्या वेळी गाई, म्हैसींनी उलट फिरून बिबट्यावर धाव घेतली. त्यामुळे जनावरे वाचली. त्याआधी कादवे येथे लक्ष्मण ढेबे यांची एक गाय व रुळे येथील रवींद्र धोंडिबा कोकरे …
The post पानशेत परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; दोन जनावरांचा फडशा appeared first on पुढारी.