जगातील सर्वात महागडी बिर्याणी!

दुबई : बिर्याणीचे चाहते जगभरात आहेत. आपल्याकडे विशेषतः हैदराबादी दम बिर्याणी अतिशय लोकप्रिय आहे. लखनौची बिर्याणीही देश-विदेशात प्रसिद्ध आहे. मात्र, बिर्याणीची एखादी डिश तब्बल 20 हजार रुपयांचीही असू शकते याची आपण कल्पना करणार नाही. ही जगातील सर्वात महागडी बिर्याणी असून ती दुबईत मिळते. तिला असे काय सोने लागले आहे, असा प्रश्न काहीजण विचारू शकतात. मात्र, … The post जगातील सर्वात महागडी बिर्याणी! appeared first on पुढारी.

जगातील सर्वात महागडी बिर्याणी!

दुबई : बिर्याणीचे चाहते जगभरात आहेत. आपल्याकडे विशेषतः हैदराबादी दम बिर्याणी अतिशय लोकप्रिय आहे. लखनौची बिर्याणीही देश-विदेशात प्रसिद्ध आहे. मात्र, बिर्याणीची एखादी डिश तब्बल 20 हजार रुपयांचीही असू शकते याची आपण कल्पना करणार नाही. ही जगातील सर्वात महागडी बिर्याणी असून ती दुबईत मिळते. तिला असे काय सोने लागले आहे, असा प्रश्न काहीजण विचारू शकतात. मात्र, या बिर्याणीला खरोखरच सोने चिकटलेले आहे!
‘बॉम्बे बरो’ नावाच्या या रेस्टॉरंटमध्ये मिळणार्‍या या बिर्याणीची किंमत 20 हजार रुपये आहे. या रेस्टॉरंटच्या मालकाने आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला या बिर्याणीला मेन्यूमध्ये लाँच केले. ही एक प्लेट बिर्याणी एकावेळी सहा जण खाऊ शकतात. रॉयल बिर्याणीला 23 कॅरेट सोन्याने सजवण्यात आले आहे.
या बिर्याणीमध्ये काश्मिरी मटण कबाब, पुरानी दिल्ली मटन चॉप्स, चिकन कबाब, मुघलई कोफ्ते आणि मलाई चिकन यांचा समावेश आहे. ऑर्डर केल्याच्या 45 मिनिटांनंतर ही बिर्याणी तुमच्या टेबलवर असेल. गार्निशिंगमध्ये केसर, सोने आणि सोबत सॉस, करी आणि रायता. हे सर्व सोन्याच्या ताटातून मिळते!
The post जगातील सर्वात महागडी बिर्याणी! appeared first on पुढारी.

दुबई : बिर्याणीचे चाहते जगभरात आहेत. आपल्याकडे विशेषतः हैदराबादी दम बिर्याणी अतिशय लोकप्रिय आहे. लखनौची बिर्याणीही देश-विदेशात प्रसिद्ध आहे. मात्र, बिर्याणीची एखादी डिश तब्बल 20 हजार रुपयांचीही असू शकते याची आपण कल्पना करणार नाही. ही जगातील सर्वात महागडी बिर्याणी असून ती दुबईत मिळते. तिला असे काय सोने लागले आहे, असा प्रश्न काहीजण विचारू शकतात. मात्र, …

The post जगातील सर्वात महागडी बिर्याणी! appeared first on पुढारी.

Go to Source