पुणे : घरातील वसतिगृहांना व्यावसायिक मिळकत कर!
पुणे : पुढारी वृत्तसेवा : घरामध्ये वसतिगृह चालवणार्यांना आता व्यवसायिक स्वरूपाचा मिळकत कर महापालिकेला भरावा लागणार आहे. यासंदर्भाचा प्रस्ताव महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला आहे.
शहरात विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी राज्यभरासह देशातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शहरात येऊन राहतात. तसेच शहर व जिल्ह्यात आयटी व औद्योगिक क्षेत्र मोठे असल्याने नोकरी करण्यासाठीही तरुण-तरुणी शहरात येतात.
सर्व पेठा, कोथरूड, कर्वेनगर, कात्रज, धनकवडी, विमाननगर, लोहगाव, शिवाजीनगर, औंध, डेक्कन जिमखाना, सेनापती बापट रस्ता आदी भागात निवासी मिळकतींमध्ये विद्यार्थी कॉट बेसिस, पेइंग गेस्ट म्हणून राहतात. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध मार्गांचा शोध घेतला जात आहे. नियमित करवसुलीसह थकबाकी वसूल करणे, इमारती सील करणे, त्यांचा लिलाव करणे, कर लागला नाही अशा मिळकती शोधून त्यांच्याकडून कर आकारणी सुरू करणे, जागा वापरात बदल केल्यास त्यानुसार कर लावणे या पद्धतीने वर्षभर उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून घरामध्ये वसतिगृह चालणार्या मिळकतींना व्यावसायिक स्वरूपाचा कर आकारला
जाणार आहे. यासंदर्भाचा प्रस्ताव महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला आहे.
500 कोटींचे लक्ष्य
मार्च अखेरपर्यंत आणखी 500 कोटी रुपये करवसुलीचे लक्ष्य आहे. 2023-24 या वर्षात मिळकतकर विभागाकडून 2200 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून, आजपर्यंत (ता. 15) 1701 कोटी रुपये इतका कर जमा झाला आहे.
शहरात निवासी मिळकतीमध्ये वसतिगृह, पेइंग गेस्ट ठेवले जातात. हा निवासी वापर नाही, त्यामुळे अशा मिळकतींना बिगर निवासी कर लावला जाणार आहे.
– अजित देशमुख, उपायुक्त, मिळकतकर
हेही वाचा
खासगी नाल्यावर बंधार्यासाठी आता पूर्वपरवानगी आवश्यक
Indus Civilization : उल्कापातामुळे झाला होता सिंधू संस्कृतीचा विनाश?
Sudhakar Badgujar : बडगुजर यांचा समर्थक पवन मटालेंसह तिघांची चौकशी
The post पुणे : घरातील वसतिगृहांना व्यावसायिक मिळकत कर! appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : घरामध्ये वसतिगृह चालवणार्यांना आता व्यवसायिक स्वरूपाचा मिळकत कर महापालिकेला भरावा लागणार आहे. यासंदर्भाचा प्रस्ताव महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. शहरात विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी राज्यभरासह देशातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शहरात येऊन राहतात. तसेच शहर व जिल्ह्यात आयटी व …
The post पुणे : घरातील वसतिगृहांना व्यावसायिक मिळकत कर! appeared first on पुढारी.