खासगी नाल्यावर बंधार्‍यासाठी आता पूर्वपरवानगी आवश्यक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खासगी जागेतील नाल्यांवर बंधारे बांधताना संबधित भोगवटादाराकडून स्टॅम्पपेपरवर पूर्वपरवानगी घेऊन त्याची नोटरी करावी, असे आदेश मृद् व जलसंधारण विभागाचे अवर सचिव प्रकाश पाटील यांनी दिले आहेत. राज्यात मृद व जलसंधारण विभागाकडून 0 ते 600 हेक्टर सिंचन क्षमतेचे विविध प्रकारचे बंधारे बांधण्यात येतात. त्यापैकी 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेचे कोल्हापूर … The post खासगी नाल्यावर बंधार्‍यासाठी आता पूर्वपरवानगी आवश्यक appeared first on पुढारी.

खासगी नाल्यावर बंधार्‍यासाठी आता पूर्वपरवानगी आवश्यक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खासगी जागेतील नाल्यांवर बंधारे बांधताना संबधित भोगवटादाराकडून स्टॅम्पपेपरवर पूर्वपरवानगी घेऊन त्याची नोटरी करावी, असे आदेश मृद् व जलसंधारण विभागाचे अवर सचिव प्रकाश पाटील यांनी दिले आहेत. राज्यात मृद व जलसंधारण विभागाकडून 0 ते 600 हेक्टर सिंचन क्षमतेचे विविध प्रकारचे बंधारे बांधण्यात येतात. त्यापैकी 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेचे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधारे, सिमेंट साठवण बंधारे, सिमेंट नाला बांध या कामांची शासन, महामंडळ, जिल्हा परिषद, जिल्हा वर्षिक योजना या निधीतून अंमलबजावणी करता येते.
स्थानिक पातळीवर मागणी व भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन अशा प्रकारातील बांधकामे ही नदी किंवा नाले, ओढ्याच्या पात्रात करण्यात येतात. अशा ठिकाणी भूसंपादन करण्याची गरज लागत नाही. मात्र, खासगी क्षेत्रात बांधण्यात येणा-या अशा प्रकारच्या बंधा-यांचे काम करताना शासनाने आता नवीन नियमावलीचे पालन करण्याचे आदेश काढले आहेत.
शासन आदेश काय म्हणतो

जेथे भूसंपादन आवश्यक नाही अशा ठिकाणी कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधारे, सिमेंट साठवण बंधारे, सिमेंट नाला बांध अशा प्रकारची कामे करावीत.
 प्रकल्प सुरू करण्यापूर्वी कामांचे प्रस्ताव तयार करताना संबधित ग्रामपंचायत ठराव, ग्रामसभेचे ठराव घेऊन प्रस्तावासोबत जोडावेत.
 सिमेंट क्राँक्रिट नाला बंधा-यांचे स्थळ निश्चित करताना बंधा-याच्या स्थळाबाबत अचूकता साध्य होण्यासाठी 1:25000 (टोपो सीट) या प्रमाणाचे नकाशे वापरावेत.
नाला उतार दोन टक्केपेक्षा कमी असणे गरजचे आहे.

हेह वाचा

Sudhakar Badgujar : बडगुजर यांचा समर्थक पवन मटालेंसह तिघांची चौकशी
सागरी कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध
Pune News : साडेसात हजार पुस्तकांनी साकारला ‘भारत’ 

The post खासगी नाल्यावर बंधार्‍यासाठी आता पूर्वपरवानगी आवश्यक appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खासगी जागेतील नाल्यांवर बंधारे बांधताना संबधित भोगवटादाराकडून स्टॅम्पपेपरवर पूर्वपरवानगी घेऊन त्याची नोटरी करावी, असे आदेश मृद् व जलसंधारण विभागाचे अवर सचिव प्रकाश पाटील यांनी दिले आहेत. राज्यात मृद व जलसंधारण विभागाकडून 0 ते 600 हेक्टर सिंचन क्षमतेचे विविध प्रकारचे बंधारे बांधण्यात येतात. त्यापैकी 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेचे कोल्हापूर …

The post खासगी नाल्यावर बंधार्‍यासाठी आता पूर्वपरवानगी आवश्यक appeared first on पुढारी.

Go to Source