वटवाघळं उलटे का लटकतात?

नवी दिल्ली : निसर्ग अनेक थक्क करणारी द़ृश्ये दाखवत असतो. त्यामध्ये अनोख्या पशू-पक्ष्यांचाही समावेश असतो. वटवाघळं ही अशाच विचित्र जीवांपैकी एक आहेत. ती आकाशात उडत असली तरी त्यांना पक्षी म्हणता येत नाही. वटवाघळं ही सस्तन प्राणी आहेत आणि ती पंखाने नव्हे तर पातळ पडद्यांच्या सहाय्याने उडतात. वटवाघळं दिवसभर उलटे लटकलेली असतात आणि सूर्यास्तानंतर खाद्य शोधण्यासाठी … The post वटवाघळं उलटे का लटकतात? appeared first on पुढारी.

वटवाघळं उलटे का लटकतात?

नवी दिल्ली : निसर्ग अनेक थक्क करणारी द़ृश्ये दाखवत असतो. त्यामध्ये अनोख्या पशू-पक्ष्यांचाही समावेश असतो. वटवाघळं ही अशाच विचित्र जीवांपैकी एक आहेत. ती आकाशात उडत असली तरी त्यांना पक्षी म्हणता येत नाही. वटवाघळं ही सस्तन प्राणी आहेत आणि ती पंखाने नव्हे तर पातळ पडद्यांच्या सहाय्याने उडतात. वटवाघळं दिवसभर उलटे लटकलेली असतात आणि सूर्यास्तानंतर खाद्य शोधण्यासाठी बाहेर पडतात. ती उलटेच का लटकत असतात याबाबत अनेकांना कुतुहल असते.
वटवाघळांचे अस्तित्व डायनासोरच्या आधीपासूनच होते असे म्हटले जाते. सर्वाधिक तापमान असलेल्या वाळवंटापासून थंड प्रदेशापर्यंत सर्वत्र त्यांचे अस्तित्व आहे. मेक्सिकन वटवाघळं उंच उडू शकतात तर लहान भुरकट रंगाची वटवाघळं अशी झोपतात की जणू काही त्यांनी श्वासोच्छ्वासच बंद केला आहे! मासे पकडणार्‍या वटवाघळांमध्ये एक खास ‘सेन्सर’ असतो, त्यामुळे त्यांना इतर जीवांच्या तुलनेत मासे लवकर दिसतात. काही वटवाघळांचे पंख हे माणसाच्या केसांसारखे पातळ असतात.
वटवाघळं ही केवळ काळीच असतात असेही नाही. होंडुरन वटवाघळं ही पांढर्‍या रंगाची असतात व त्यांचे नाक पिवळे असते. पक्ष्यांप्रमाणे वटवाघळांना थेट जमिनीवरून उडता येत नाही. त्यांच्या विशिष्ट पंखांमुळे त्यांना मोठी झेप घेता येत नाही आणि त्यांचे मागील पाय इतके लहान व अविकसित असतात की ते धावत जाऊन वेग पकडू शकत नाहीत. उलटे लटकून राहिल्यावरच त्यांना सहजपणे उडता येते. वटवाघळं सामान्यपणे अंधार्‍या गुहेत राहतात व रात्रीच बाहेर निघतात. ते झोपलेले असताना खाली पडत नाहीत याचे कारण म्हणजे त्यांच्या पायाची खास रचना. पायांचे पंजे त्यांचे वजन उचलण्यास मदत करतात.
The post वटवाघळं उलटे का लटकतात? appeared first on पुढारी.

नवी दिल्ली : निसर्ग अनेक थक्क करणारी द़ृश्ये दाखवत असतो. त्यामध्ये अनोख्या पशू-पक्ष्यांचाही समावेश असतो. वटवाघळं ही अशाच विचित्र जीवांपैकी एक आहेत. ती आकाशात उडत असली तरी त्यांना पक्षी म्हणता येत नाही. वटवाघळं ही सस्तन प्राणी आहेत आणि ती पंखाने नव्हे तर पातळ पडद्यांच्या सहाय्याने उडतात. वटवाघळं दिवसभर उलटे लटकलेली असतात आणि सूर्यास्तानंतर खाद्य शोधण्यासाठी …

The post वटवाघळं उलटे का लटकतात? appeared first on पुढारी.

Go to Source