अयोध्येतील मशिद असणार ताजमहालपेक्षा सुंदर; इमाम करणार भूमिपूजन
अयोध्येत मशीद बांधण्यात येणार आहे. या मशिदीचे भूमिपूजन मक्का येथील इमाम-ए-हरम-अब्दुल रेहमान अल सुदैस यांच्या हस्ते होणार आहे. इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनच्या वतीने या मशिदीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या मशिदीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल, संग्रहालय, ग्रंथालय, शाकाहारी किचन आदींची सुविधा असणार आहे.
अयोध्येपासून २५ कि.मी. अंतरावर बांधकाम
अयोध्येपासून २५ कि. मी. अंतरावरील धन्नीपूर गावात प्रस्तावित मशिदीचे बांधकाम करण्यात येणार आहे. मशीद मोहम्मद बिन अब्दुल्ला असे मशिदीला नाव देण्यात आले आहे.
सरकारकडून जागा
राममंदिर निवाड्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार उत्तर प्रदेश सरकारने मशिदीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या मशिदीच्या डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष आणि मुंबईतील भाजपचे नेते हाजी अराफत शेख आहेत.
देशातील सर्वात मोठी मशिद होणार
भारतातील सर्वात मोठी मशीद या ठिकाणी उभा करण्यात येणार असल्याची माहिती शेख यांनी दिली. जगातील सर्वात मोठे कुराण या मशिदीमध्ये पाहावयास मिळणार आहे.
२१ फूट उंचीचे आणि ३६ फूट रुंदीचे कुराण
या भव्य कुराणाची उंची २१ फूट, तर रुंदी ३६ फूट असणार आहे. अजानसाठी मशिदीमध्ये पाच मिनार उभा करण्यात येणार आहे. या मशिदीचे सौंदर्य ताजमहालपेक्षा अधिक खुलणार आहे.
कोण आहेत इमाम : अब्दुल रेहमान इब्न अब्दुल अजीज
अल सुदैस असे इमामांचे पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म सौदी अरेबियातील कासीम या ठिकाणी १९६१ साली झाला. ते उच्चशिक्षित आहेत. वयाच्या १२ व्या वर्षीच त्यांना कुराण मुखोद्गत होते. त्यांनी शरियामध्ये पीएच.डी. केली आहे.
हेही वाचा :
कोण आहे सलीम कुत्ता? नाशिकशी काय संबंध?
उल्कापातामुळे झाला होता सिंधू संस्कृतीचा विनाश?
….तर टाटांचा सायरस मिस्त्री होईल! रतन टाटा यांना धमकीचा फोन
The post अयोध्येतील मशिद असणार ताजमहालपेक्षा सुंदर; इमाम करणार भूमिपूजन appeared first on पुढारी.
अयोध्येत मशीद बांधण्यात येणार आहे. या मशिदीचे भूमिपूजन मक्का येथील इमाम-ए-हरम-अब्दुल रेहमान अल सुदैस यांच्या हस्ते होणार आहे. इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनच्या वतीने या मशिदीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या मशिदीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल, संग्रहालय, ग्रंथालय, शाकाहारी किचन आदींची सुविधा असणार आहे. अयोध्येपासून २५ कि.मी. अंतरावर बांधकाम अयोध्येपासून २५ कि. मी. अंतरावरील धन्नीपूर गावात प्रस्तावित मशिदीचे …
The post अयोध्येतील मशिद असणार ताजमहालपेक्षा सुंदर; इमाम करणार भूमिपूजन appeared first on पुढारी.