राज्यात रोज 23 नवजात बालकांचा मृत्यू

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या सात महिन्यांत 4 हजार 872 नवजात म्हणजे 28 दिवसांपर्यंतच्या बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार दर दिवशी राज्यात 23 नवजात बालकांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येते. त्यापैकी 795 बालकांचा मृत्यू श्वसनाच्या त्रासाने झाला आहे. आरोग्य विभागाने राज्यात नवजात शिशूंच्या उपचाराकरिता 52 विशेष नवजात काळजी कक्ष स्थापन … The post राज्यात रोज 23 नवजात बालकांचा मृत्यू appeared first on पुढारी.

राज्यात रोज 23 नवजात बालकांचा मृत्यू

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या सात महिन्यांत 4 हजार 872 नवजात म्हणजे 28 दिवसांपर्यंतच्या बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार दर दिवशी राज्यात 23 नवजात बालकांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येते. त्यापैकी 795 बालकांचा मृत्यू श्वसनाच्या त्रासाने झाला आहे. आरोग्य विभागाने राज्यात नवजात शिशूंच्या उपचाराकरिता 52 विशेष नवजात काळजी कक्ष स्थापन करण्यात केले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यासंदर्भातील एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.
राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांत एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत 0 ते 5 वर्षे या वयोगटातील तब्बल 4 हजार 324 बालकांचा विविध आजारांमुळे मृत्यू झाल्याचे लेखी माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेतील तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे, तर सप्टेंबरमधील आकडेवारीनुसार सध्या 73 हजार 998 तीव्र कुपोषित, 4 लाख 17 हजार 349 मध्यम कुपोषित बालके असल्याचेही तटकरे यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे.
आदिवासी जिल्ह्यातील बालमृत्यूंबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या आमश्या पाडवी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
The post राज्यात रोज 23 नवजात बालकांचा मृत्यू appeared first on पुढारी.

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या सात महिन्यांत 4 हजार 872 नवजात म्हणजे 28 दिवसांपर्यंतच्या बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार दर दिवशी राज्यात 23 नवजात बालकांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येते. त्यापैकी 795 बालकांचा मृत्यू श्वसनाच्या त्रासाने झाला आहे. आरोग्य विभागाने राज्यात नवजात शिशूंच्या उपचाराकरिता 52 विशेष नवजात काळजी कक्ष स्थापन …

The post राज्यात रोज 23 नवजात बालकांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source