सांगली : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, ५ जणांच्या टोळीला अटक
सागांव ( ता.शिराळा), पुढारी वृत्तसेवा : येथे वनविभागाने कारवाई करून व्हेल माशाची उल्टीची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ ग्रॅम उलटीचा नमुना , पाच मोबाईल , दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून याचे मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर घटना शुक्रवारी (दि.१५) दुपारी चार च्या दरम्यान घडली. रोहन सर्जेराव पाटील (वय २९ रा. कोनवडे ता. भुदरगड जि. कोल्हापूर)
प्रथमेश सुरेश मोरे (वय २३ वर्षे रा.सोळंबी , ता.राधानगरी, जि. कोल्हापूर) दिग्विजय उत्तम पाटील (वय २४ रा.सागाव, ता.शिराळा, जि. सांगली ) लक्ष्मण सुखदेव सावळे ( वय ३४ रा.लातूर सध्या रा. कळंबोली मुंबई ) दत्तात्रय आनंदराव पाटील ( वय वर्षे ४१ रा. बिऊर ता. शिराळा, जि. सांगली) असे संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की , सागांव येथील पेट्रोल पंपावर बनावट ग्राहक बनून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गेले होते. यावेळी संशयित दत्तात्रय आनंदराव पाटील हा ग्राहकांची भेट घेऊन व्हेल माशाची उल्टीचा नमुना दाखविण्यासाठी आणतो म्हणून गेला. अर्ध्या तासाने दत्तात्रय पाटील हा रोहन सर्जेराव पाटील ,प्रथमेश सुरेश मोरे दिग्विजय उत्तम पाटील लक्ष्मण सुखदेव सावळे , दत्तात्रय आनंदराव पाटील असे पाच पेट्रोल पंपावर आले.त्यांनी बॅगेमध्ये असलेला व्हेल माशाची उल्टी (Ambergris) दाखवली. याबाबत आपण बऱ्याच व्यवहारात फसवणूक झाली आहे त्यामुळे संपूर्ण मुद्देमाल पाहिल्यावरच व्यवहार करूया असे सांगितले.
यावेळी उपस्थित वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक डॉ.अजित साजने , मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांचे समवेत पेट्रोलियम पंपावरती सापळा रचून वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, अनिल वाजे, हणमंत प्र. पाटील, विशाल डुबल, भिवा कोळेकर, रजनिकांत दरेकर, बाबासो गायकवाड , मोहन सुतार यांनी संशयित पाच जणांना ताब्यात घेतले.
हेही वाचलंत का?
Rohit Sharma : ‘हार्दिक’ची कर्णधारपदी वर्णी, मुंबई इंडियन्सने शेअर केला ‘रोहित’चा इमोशनल व्हिडिओ
Mysuru airport : म्हैसूर विमानतळाला ‘टिपू सुलतान’ नाव? काँग्रेसच्या आमदाराच्या मागणीमुळे राजकारण तापले; भाजपचा कडाडून विरोध
The post सांगली : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, ५ जणांच्या टोळीला अटक appeared first on पुढारी.
सागांव ( ता.शिराळा), पुढारी वृत्तसेवा : येथे वनविभागाने कारवाई करून व्हेल माशाची उल्टीची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ ग्रॅम उलटीचा नमुना , पाच मोबाईल , दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून याचे मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर घटना शुक्रवारी (दि.१५) दुपारी …
The post सांगली : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, ५ जणांच्या टोळीला अटक appeared first on पुढारी.