छत्रपती संभाजीनगर : बदनापूरहून येणाऱ्या दाम्पत्याचे २१ तोळ्यांचे दागिने चोरीला

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नातेवाईकाच्या लग्नासाठी बदनापूरहून बसने छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या दाम्पत्याच्या बॅगमधून तब्बल साडेबारा लाखांचे २१ तोळे (२१० ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये रोकड चोरीला गेली. अवघ्या एक तासाच्या प्रवासातच चोरट्यांनी डल्ला मारला. १४ डिसेंबर रोजी सकाळी सव्वाअकरा ते सव्वाबारा वाजेदरम्यान ही घटना घडली. कमल पंडितराव चव्हाण (५५, रा. नानेगाव, ता. … The post छत्रपती संभाजीनगर : बदनापूरहून येणाऱ्या दाम्पत्याचे २१ तोळ्यांचे दागिने चोरीला appeared first on पुढारी.

छत्रपती संभाजीनगर : बदनापूरहून येणाऱ्या दाम्पत्याचे २१ तोळ्यांचे दागिने चोरीला

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नातेवाईकाच्या लग्नासाठी बदनापूरहून बसने छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या दाम्पत्याच्या बॅगमधून तब्बल साडेबारा लाखांचे २१ तोळे (२१० ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये रोकड चोरीला गेली. अवघ्या एक तासाच्या प्रवासातच चोरट्यांनी डल्ला मारला. १४ डिसेंबर रोजी सकाळी सव्वाअकरा ते सव्वाबारा वाजेदरम्यान ही घटना घडली. कमल पंडितराव चव्हाण (५५, रा. नानेगाव, ता. बदनापूर) असे याबाबत फिर्याद नोंदवणाऱ्या महिलेचे नाव आहे.
चव्हाण दाम्पत्य शेती करतात. १४ डिसेंबरला नातेवाईकाच्या लग्नासाठी पती-पत्नी छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी बदनापूरला आले. तेथून ते नाशिककडे जाणाऱ्या बसमध्ये चढले. त्यांच्याकडे तीन बॅग होत्या. बसण्यासाठी जागा नसल्यामुळे चव्हाण यांनी बॅग खाली ठेवल्या आणि दोघेही बसमध्ये उभा राहून आले. दरम्यान, त्यांच्या बॅगजवळ चार महिला बसलेल्या होत्या. या चारही महिला शहरात धूत हॉस्पिटल चौकात उतरल्या. बस सिडको बसस्थानकात आल्यावर चव्हाण दाम्पत्य उरतले. तेव्हा त्यांनी ज्या बॅगमध्ये दागिने ठेवले होते तपासले असता मिळून आले नाहीत.
चोरट्यांनी ८ तोळे सोन्याच्या दोन चेन, ७ तोळ्यांचा पोहेहार, दोन तोळ्यांच्या चार अंगठ्या, १ तोळ्याचे मिनी गंठण, १ तोळ्याचे झुंबर, १ तोळ्यांची पोत, १ तोळे सोन्याची एकदानी आणि २० हजार रुपये रोकड, असा जवळपास साडेबारा लाखांचा ऐवज लंपास केला. चव्हाण दाम्पत्याने तत्काळ बसमधील प्रवाशांना विचारणा केली मात्र, सर्वांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर धूत हॉस्पिटल चौकात उतरलेल्या महिलांवर संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर ही माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक आत्माराम घुगे करीत आहेत.
हेही वाचलंत का?

ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरांकडून दाऊदच्या शूटरसाठी पार्टीचे आयोजन? एसआयटी मार्फत होणार चौकशी
Rohit Sharma : ‘हार्दिक’ची कर्णधारपदी वर्णी, मुंबई इंडियन्सने शेअर केला ‘रोहित’चा इमोशनल व्हिडिओ

The post छत्रपती संभाजीनगर : बदनापूरहून येणाऱ्या दाम्पत्याचे २१ तोळ्यांचे दागिने चोरीला appeared first on पुढारी.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नातेवाईकाच्या लग्नासाठी बदनापूरहून बसने छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या दाम्पत्याच्या बॅगमधून तब्बल साडेबारा लाखांचे २१ तोळे (२१० ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये रोकड चोरीला गेली. अवघ्या एक तासाच्या प्रवासातच चोरट्यांनी डल्ला मारला. १४ डिसेंबर रोजी सकाळी सव्वाअकरा ते सव्वाबारा वाजेदरम्यान ही घटना घडली. कमल पंडितराव चव्हाण (५५, रा. नानेगाव, ता. …

The post छत्रपती संभाजीनगर : बदनापूरहून येणाऱ्या दाम्पत्याचे २१ तोळ्यांचे दागिने चोरीला appeared first on पुढारी.

Go to Source