सचिन अ बिलियन ड्रीम्स, सनई चौघडे पुन्हा भेटीला

सचिन अ बिलियन ड्रीम्स, सनई चौघडे पुन्हा भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या दर्जेदार चित्रपटांची जत्रा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर रसिक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अशोक सराफ आणि उपेंद्र लिमये यांचा समीर पाटील दिग्दर्शित ‘शेंटीमेंटल’, सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि श्रेयस तळपदे (Marathi Films) यांचा राजीव पाटील दिग्दर्शित सुप्परहिट ‘सनई चौघडे’, मास्टर ब्लास्टर सचिनच्या आयुष्यावर आधारित जेम्स एर्स्काइन दिग्दर्शित ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ आणि मृण्मयी देशपांडे, धर्मेंद्र गोहिल या सुप्रसिद्ध कलाकारांचा अंबरीश दरक दिग्दर्शित ‘अनुराग’ हे चित्रपट ‘अल्ट्रा झकास’वर रसिक प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. (Marathi Films)
संबंधित बातम्या –

Sunny Leon : सनी लिओनी दिसणार नव्या पार्टी डान्समध्ये
Bollywood Diwali Party : मृणाल ठाकुर ते दिशा परमारपर्यंत सेलेब्सचा दिवाळी लूक्स
सातव्या मुलीची सातवी मुलगी : पंचपिटीकेतल्या दुसऱ्या पेटीमधून कोणतं रहस्य उलगडणार?

‘शेंटीमेंटल’ची कथा चोरीला गेलेले दागिने पोलिसांना बिहारला पाठवते तर अनुरागची कथा पूर्णपणे आठवणींना उजाळा देत लेह लडाखमध्ये वसते. सनई चौघडे सईच्या वैवाहिक शोधाचा एक नवीन मार्ग असून सचिन अ बिलियन ड्रीम्समध्ये सचिन तेंडुलकरच्या प्रेरक आयुष्याच्या छटा या यशस्वी होण्याच्या पाऊलवाटा आहेत.

शेंटीमेंटल आणि सचिन अ बिलियन ड्रीम्स ओटीटीवर उपलब्ध असून अनुराग ८ नोव्हेंबर रोजी तर सनई चौघडे २२ नोव्हेंबर प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by T-Series (@tseries.official)

The post सचिन अ बिलियन ड्रीम्स, सनई चौघडे पुन्हा भेटीला appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या दर्जेदार चित्रपटांची जत्रा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर रसिक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अशोक सराफ आणि उपेंद्र लिमये यांचा समीर पाटील दिग्दर्शित ‘शेंटीमेंटल’, सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि श्रेयस तळपदे (Marathi Films) यांचा राजीव पाटील दिग्दर्शित सुप्परहिट ‘सनई चौघडे’, मास्टर ब्लास्टर सचिनच्या आयुष्यावर आधारित जेम्स एर्स्काइन दिग्दर्शित …

The post सचिन अ बिलियन ड्रीम्स, सनई चौघडे पुन्हा भेटीला appeared first on पुढारी.

Go to Source