यवतमाळ : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; किन्ही येथील उड्डाणपुलावरील घटना

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : किन्ही येथील उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. ८) तर कारचालकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. यवतमाळ शहरालगतच्या किन्ही येथील उड्डाणपुलावर रात्री ११:३० वाजता भीषण अपघात झाला. याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय महामार्गावर चुकीच्या दिशेने प्रवास करणे जीवावर बेतल्याचे अपघातातून … The post यवतमाळ : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; किन्ही येथील उड्डाणपुलावरील घटना appeared first on पुढारी.

यवतमाळ : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; किन्ही येथील उड्डाणपुलावरील घटना

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : किन्ही येथील उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. ८) तर कारचालकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. यवतमाळ शहरालगतच्या किन्ही येथील उड्डाणपुलावर रात्री ११:३० वाजता भीषण अपघात झाला.

याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय महामार्गावर चुकीच्या दिशेने प्रवास करणे जीवावर बेतल्याचे अपघातातून दिसते. ढाबा चालक सागर पाटील हा एमएच-३१ सीएम-३६१८ क्रमांकाच्या कारने यवतमाळकडे येत होता. तर, बोथबोडन येथील युवक नरेंद्र वसंत तुरी (वय ३५) हा दुचाकीने बोथबोडनकडे जात होता. कारचालकाने चुकीच्या दिशेने येऊन दुचाकीला धडक दिली. यात नरेंद्र तुरी याच्या एमएच-२९-सीसी-१२१४ क्रमांकाच्या दुचाकीचा चुराडा झाला. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर, कारचालक सागर पाटील हा गंभीर जखमी होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच किन्ही येथील ग्रामस्थ व ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणात जितेंद्र वसराम राठोड रा. बोथबोडन याच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी कारचालक सागर पाटील याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
The post यवतमाळ : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; किन्ही येथील उड्डाणपुलावरील घटना appeared first on पुढारी.

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : किन्ही येथील उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. ८) तर कारचालकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. यवतमाळ शहरालगतच्या किन्ही येथील उड्डाणपुलावर रात्री ११:३० वाजता भीषण अपघात झाला. याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय महामार्गावर चुकीच्या दिशेने प्रवास करणे जीवावर बेतल्याचे अपघातातून …

The post यवतमाळ : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; किन्ही येथील उड्डाणपुलावरील घटना appeared first on पुढारी.

Go to Source