जळगाव: चाळीसगाव, पारोळा, मुक्ताईनगर येथे चोरी : ४ लाख ७० हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील चाळीसगाव, जळगाव, पारोळा आणि मुक्ताईनगर या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी ४ लाख ७० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. Jalgaon News याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील रथ गल्लीतील सराफ बाजारमध्ये राजरत्न ज्वेलर्स आहे. येथे … The post जळगाव: चाळीसगाव, पारोळा, मुक्ताईनगर येथे चोरी : ४ लाख ७० हजारांचा मुद्देमाल लंपास appeared first on पुढारी.

जळगाव: चाळीसगाव, पारोळा, मुक्ताईनगर येथे चोरी : ४ लाख ७० हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील चाळीसगाव, जळगाव, पारोळा आणि मुक्ताईनगर या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी ४ लाख ७० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. Jalgaon News
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील रथ गल्लीतील सराफ बाजारमध्ये राजरत्न ज्वेलर्स आहे. येथे सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या तीन अनोळखी महिलांनी दुकानदाराचे लक्ष विचलित करून बागेतील ३ लाख २० हजारांचे सोन्या- चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांत राजेंद्र वर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहे. Jalgaon News
जळगाव शहरातील फुले मार्केट मागील दाना बाजार पोल्ट्री फार्म या भागात अज्ञात व्यक्तीने प्लास्टिकच्या पिशवीतील पेन्शनची ६० हजाराची रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी जहूर अली वजीर अली सैय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास योगेश पाटील करीत आहेत.
पारोळा येथील बस स्थानक नाशिक येथील महिला बसमध्ये चढत असताना ३९ हजारांची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी पारोळा पोलिसांत कमलबाई बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास कॉन्स्टेबल संजय पवार करीत आहे.
मुक्ताईनगर येथील कैलास दाणी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. हेड कॉन्स्टेबल लीलाधर भोई पुढील तपास करीत आहे.
हेही वाचा 

जळगाव : यावल तालुक्यातील दोघांवर स्थानबध्दतेची कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Buldhana News : जळगाव जामोदचे मुख्याधिकारी, विद्युत पर्यवेक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
Jalgaon Crime : जळगावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

The post जळगाव: चाळीसगाव, पारोळा, मुक्ताईनगर येथे चोरी : ४ लाख ७० हजारांचा मुद्देमाल लंपास appeared first on पुढारी.

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील चाळीसगाव, जळगाव, पारोळा आणि मुक्ताईनगर या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी ४ लाख ७० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. Jalgaon News याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील रथ गल्लीतील सराफ बाजारमध्ये राजरत्न ज्वेलर्स आहे. येथे …

The post जळगाव: चाळीसगाव, पारोळा, मुक्ताईनगर येथे चोरी : ४ लाख ७० हजारांचा मुद्देमाल लंपास appeared first on पुढारी.

Go to Source