हृतिक-दीपिकाचा डान्स पाहाच, करण ग्रोव्हर स्क्वॉड्रन लीडरच्या भूमिकेत
पुढारी ऑनलाईन डेस्क : फायटर चित्रपटातील “शेर खुल गए” हे नवे गाणे रिलीज झाले आहे. हे खास गाणं संगीतकार विशाल-शेखरने रचले आहे. या गाण्यात बॉलीवूडचा आयकॉन हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा दमदार डान्स पाहण्यासारखा आहे. (Fighter Song Sher Khul Gaye) सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित मार्लफिक्स प्रोडक्शनचा फायटर आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत आहे. करण सिंग ग्रोव्हर फायटरमध्ये स्क्वॉड्रन लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. (Fighter Song Sher Khul Gaye)
संबंधित बातम्या –
Chris Gayle : Dunki च्या लुट पुट गया गाण्यावर क्रिस गेलचे थिरकले पाय
Urfi Javed Marriage : मला तुझ्यासारखी पत्नी हवीय; उर्फीला पुनीत सुपरस्टारची मागणी
Bobby Deol : चाहत्याला वाईट वागणूक दिल्याबद्दल बॉबी देओल ट्रोल
“शेर खुल गए” साउंडट्रॅक रिलीज होतात हे गाणं चार्ट-टॉपिंग हिट ठरल आहे. या गाण्यातील करणची उपस्थिती लक्षवेधी आहे. “दिल मिल गये” आणि “कुबूल है” सारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन शोमधील त्याच्या संस्मरणीय भूमिकांपासून ते “अलोन” आणि “हेट स्टोरी 3” सारख्या चित्रपटांसह बॉलीवूडमध्ये ठसा उमटवण्यापर्यंत करण सिंग ग्रोव्हर आता नवी प्रतिभा दाखवायला तयार आहे.
फायटर २५ जानेवारी, २०२४ रोजी रिलीज होण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, स्क्वाड्रन लीडर सरताज गिल उर्फ ताज म्हणून करणचा ऑन-स्क्रीन करिश्मा आणि “शेर खुल गए” मधील विशाल-शेखर यांच्या संगीताची जादू आता अनुभवयाला मिळणार आहे.
The post हृतिक-दीपिकाचा डान्स पाहाच, करण ग्रोव्हर स्क्वॉड्रन लीडरच्या भूमिकेत appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : फायटर चित्रपटातील “शेर खुल गए” हे नवे गाणे रिलीज झाले आहे. हे खास गाणं संगीतकार विशाल-शेखरने रचले आहे. या गाण्यात बॉलीवूडचा आयकॉन हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा दमदार डान्स पाहण्यासारखा आहे. (Fighter Song Sher Khul Gaye) सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित मार्लफिक्स प्रोडक्शनचा फायटर आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत आहे. करण सिंग ग्रोव्हर फायटरमध्ये …
The post हृतिक-दीपिकाचा डान्स पाहाच, करण ग्रोव्हर स्क्वॉड्रन लीडरच्या भूमिकेत appeared first on पुढारी.