समीर शाह, हेड- ऑनलाइन बिझनेस, ॲक्सिस सिक्युरिटीज
सेवानिवृत्ती म्हणजे फक्त कामामधून निवृत्त होणे असे नाही, तर आर्थिक स्वावलंबीपणा संपादित करणे देखील महत्त्वाचे आहे, ज्यामुळे कामावरून निवृत्त झाल्यानंतर आपण पुढील काळाचा आनंद घेऊ शकतो. पण, पुरेशा प्रमाणात आर्थिक तयारी केल्यास निवृत्तीनंतर यशस्वी व उत्साही जीवनाचा आनंद घेता येऊ शकतो. (Retirement Planning)
चित्रपटांमध्ये समाजात घडणाऱ्या गोष्टींना दाखवले जाते. बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेकदा पाहायला मिळते की व्यक्ती त्याच्या सुरूवातीच्या काळात अमाप संपत्ती कमावतात, पण वृद्धत्व काळात पैशांची कमतरता जाणवू लागते. तुम्ही अशा स्थितींमागील कारणांचा कधी विचार केला आहे का? यामागील कारण म्हणजे नकळतपणे झालेल्या आर्थिक चुकांमुळे म्हातारपणात अशा संघर्षांचा सामना करावा लागतो.
गेल्या पिढीमधील आई-वडिलांनी निवृत्तीनंतर मुले त्यांची काळजी घेतील या अपेक्षेसह त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अथक मेहनत करून कामावलेल्या पैशांची गुंतवणूक केली. पण, काळ बदलला आहे. विभक्त कुटुंब संकल्पनेला महत्त्व मिळाले आहे आणि मुलांना अनेकदा कामानिमित्त परदेशात किंवा दुसऱ्या ठिकाणी राहावे लागते. तसेच, मुलांना त्यांच्या वृद्ध आईवडिलांची काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ही स्थिती पाहता व्यक्तींनी निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी सावधपणे नियोजन करणे आणि त्यांना नंतरच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही याची खात्री घेणे आवश्यक आहे.
गुंतवणूकीसंदर्भात सामान्य चुका टाळल्यास पैशांची चिंता नसलेल्या भविष्याचे नियोजन करण्यास मदत होऊ शकते. इतरांच्या अनुभवांमधून शिकवण घेत तुम्ही तुमच्या उज्ज्वल भविष्याचे नियोजन करू शकता. या प्रक्रियेमध्ये साह्य करण्यासाठी काही मार्गदर्शकतत्त्वे खाली देण्यात आली आहेत:
प्रत्येक गुंतवणुकीसोबत आर्थिक ध्येयांची आखणी करा
गुंतवणुकीला सुरूवात केल्यानंतर प्रत्येक गुंतवणूकीसोबत विशिष्ट आर्थिक ध्येय आखण्याची खात्री घ्या. अगोदर स्थापित केलेला हा उद्देश ध्येय पूर्ण होईपर्यंत मुदतपूर्व पैसे काढण्यास परावृत्त करेल. तसेच केलेल्या गुंतवणूकीला रीडिम करण्याची योग्य वेळ व स्थिती समजण्यास मदत होईल. नेहमी स्वतंत्र सेवानिवृत्ती निधीची तरतूद करा आणि निवृत्त होईपर्यंत त्याचा कधीही वापर करू नका.
संबंधित बातम्या
Share Market | अर्थज्ञान : शेअर मार्केट समजावून घेताना…
अर्थभान : ‘एआयएस’ करदात्यांसाठी महत्त्वाचे दस्तावेज, जाणून घ्या सविस्तर
अर्थभान : चला, समजून घेऊ भांडवली बाजार
योग्य मालमत्ता वाटप करा
नियोजनाच्या टप्प्यावर योग्यरित्या संतुलित मालमत्ता वाटप धोरण महत्त्वाचे आहे. इतरांकडे दुर्लक्ष करत एकाच मालमत्ता वर्गामध्ये अधिक प्रमाणात गुंतवणूक करणे टाळा. आपल्याला इतर मालमत्ता वर्गांपेक्षा एकाच प्रकारच्या मालमत्तेमध्ये (कर्ज, स्टॉक, गोल्ड किंवा रिअल इस्टेट) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेल्या अनेक व्यक्ती पाहायला मिळतात. पण, हा दृष्टीकोन चुकीचा आहे, कारण प्रत्येक मालमत्ता वर्गामध्ये चढ-उतार होत असतात. मालमत्ता वर्गामध्ये मंदी असेल आणि तुम्ही पैसे काढले तर काही भांडवल किंवा परताव्याचे नुकसान होऊ शकते.
कालावधीनुसार धोरण सानुकूल करा
तुमचे विद्यमान व अपेक्षित निवृत्त वयानुसार प्रभावी निवृत्त धोरण रचले जाते. निवृत्तीसाठी राहिलेल्या काळानुसार तुमच्या पोर्टफोलिओची जोखीम पत्करण्याची क्षमता निर्धारित केली जाते. निवृत्तीसाठी बराच अवधी असेल तर इक्विटीज सारख्या जोखीमयुक्त गुंतवणूका उच्च प्रमाणात करता येऊ शकतात. पण निवृत्तीसाठी कमी काळ राहिला असेल तर इक्विटीमध्ये कमी प्रमाणात गुंतवणूकीसह कर्ज सारख्या सुरक्षित साधनांना प्राधान्य द्यावे.
नियोजनाच्या वेळी खर्चांचा विचार करा
निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी नियोजन करताना सध्या जीवनात होत असलेल्या खर्चांचा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे. सामान्यत:, आपण कामकाजाच्या दिवसांपेक्षा विकेंडला अधिक खर्च करतो. यामागील कारण म्हणजे विकेंडला आपण अधिक सामाजिकीकरण, मनोरंजनाचा आनंद घेण्यासह आपले छंद जोपासतो. पण, निवृत्तीनंतर प्रत्येक दिवस विकेंड सारखा वाटतो, ज्यामुळे खर्चांमध्ये अधिक वाढ होऊ शकते.
आकस्मिक काळासाठी निधी
जीवन अनपेक्षित घटनांनी भरलेले आहे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता अनपेक्षित खर्च होऊ शकतो. निवृत्ती निधींचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी अशा स्थितींसाठी सुसज्ज असणे महत्त्वाचे आहे. विशेष आकस्मिक खात्यामध्ये पैशांची बचत करत अशा स्थितींसाठी नियोजन केल्यास आर्थिक कल्याणाचे संरक्षण होऊ शकते.
गुंतवणुकीला लवकर सुरूवात करा
जीवनात निवृत्तीसाठी गुंतवणूकीला लवकर सुरूवात तुमच्यासाठी गेम-चेंजर धोरण ठरू शकते. लहान रकमांच्या नियमित गुंतवणुकीसह निवृत्तीसाठी निधी उभारण्यास पुरेसा वेळ मिळेल. तसेच कंपाऊंडिंग क्षमतेचा अधिकाधिक फायदा मिळेल. लवकर गुंतवणूक करण्याची संधी चुकली असेल तरी लक्षात ठेवा की गुंतवणूकीचा प्रवास सुरू करण्यास कधीच विलंब झालेला नसतो.
सेवानिवृत्त नियोजन आर्थिक योजनेचे महत्त्वपूर्ण भाग असले पाहिजे. निवृत्तीसाठी नियोजन करताना तुमचे निवृत्तीचे वय निश्चित करा आणि महागाईसह वाढत्या खर्चांचा विचार करा. गुंतवणूकीस लवकर सुरूवात केल्याने मोठ्या प्रमाणात भांडवल जमा होण्यास मदत होते, ज्यामुळे तुम्हाला इक्विटी व इक्विटी-संबंधित साधने यासारख्या जोखीमयुक्त मालमत्तांमध्ये गुंतवणूक करता येईल आणि तुम्ही बाजारपेठेतील अस्थिरतेचा सामना करण्यासाठी सुसज्ज असाल. इतर उद्देशांसाठी निवृत्त निधीमधून खर्च करणे टाळा आणि हा निधी वेगळा ठेवा. कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा निवृत्तीनंतरच्या जीवनाकरिता केल्या जाणाऱ्या बचतींवर परिणाम न होण्याच्या खात्रीसाठी आकस्मिक बचत ठेवा. या मार्गदर्शकतत्त्वांचे पालन केल्यास निवृत्तीनंतर अधिक स्थिर व संपन्न जीवन जगण्याची खात्री मिळेल.
हेही वाचा
Stock Market Closing Bell | तेजीचा वारू उधळला! सेन्सेक्स १ हजार अंकांनी वाढला, निफ्टी २१,५०० जवळ
Zomato Share Price : झोमॅटोच्या शेअरला टोमॅटोचा भाव! कंपनी पहिल्यांदाच नफ्यात; गुंतवणुकदारांना दिलासा
Share Market : शेअर बाजारात छोट्या गुंतवणूकदारांनी डेरिव्हेटिव्हमध्ये गुंतवणूक का करू नये? NSE च्या सीईओंचा सल्ला
Share Market | अर्थज्ञान : शेअर मार्केट समजावून घेताना…
The post निवृत्तीनंतरच्या आनंदी जीवनासाठी ‘असे’ करा आर्थिक नियोजन appeared first on पुढारी.
सेवानिवृत्ती म्हणजे फक्त कामामधून निवृत्त होणे असे नाही, तर आर्थिक स्वावलंबीपणा संपादित करणे देखील महत्त्वाचे आहे, ज्यामुळे कामावरून निवृत्त झाल्यानंतर आपण पुढील काळाचा आनंद घेऊ शकतो. पण, पुरेशा प्रमाणात आर्थिक तयारी केल्यास निवृत्तीनंतर यशस्वी व उत्साही जीवनाचा आनंद घेता येऊ शकतो. (Retirement Planning) चित्रपटांमध्ये समाजात घडणाऱ्या गोष्टींना दाखवले जाते. बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेकदा पाहायला मिळते की …
The post निवृत्तीनंतरच्या आनंदी जीवनासाठी ‘असे’ करा आर्थिक नियोजन appeared first on पुढारी.