कोल्हापूर : एसआरटी अल्ट्रा मॕरेथॉन स्पर्धेत शाहूवाडी येथील डॉ. झुंझार माने यांचे यश
विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : आशिया खंडातील सर्वात खडतर आणि आव्हानात्मक असणारी आणि शरीराचा कस काढणारी सिंहगड-राजगड-तोरणा ही ५३ कि.मी. अल्ट्रा मॅरेथॉन शाहूवाडी येथील डॉ. झुंझार माने यांनी सलग ११ तास ३० मिनिटांत पूर्ण करुन यश मिळवले. SRT Ultra Marathon
वेस्टर्न घाट असोसिएशनतर्फे या मॕरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आशिया खंडातील सर्वात खडतर म्हणून या मॕरेथॉनची ओळख आहे. तीव्र चढ- उतार, डोंगर कपारीतून, दऱ्या- खोऱ्यातून वाट काढत ही मॕरेथॉन पूर्ण करावी लागते. देश व विदेशातील अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग नोंदवला होता. SRT Ultra Marathon
सिंहगडच्या पायथ्याला सुरु झालेली ही स्पर्धा सिंहगड-राजगड-तोरणा ते वेल्हे गाव अशी ५३ कि.मी पूर्ण करुन समाप्त झाली. डॉ. झुंझार माने सातत्याने विविध मॕरेथॉन व गडकोट मोहीम यश मिळवत असतात. विविध आरोग्यमय उपक्रम माध्यमातून फिटनेस चळवळ वाढवत असतात. त्यांना प्रशिक्षक दादासाहेब सत्रे, सचिन चौगुले, विजय चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
हेही वाचा
कोल्हापूर : व्हॉल्व्हमधून गळती; लाखो लिटर पाणी वाया
कोल्हापूर : महिलांनी प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजवावे : वैशाली शैलेंद्र काशीद
कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आजपासून बंद
The post कोल्हापूर : एसआरटी अल्ट्रा मॕरेथॉन स्पर्धेत शाहूवाडी येथील डॉ. झुंझार माने यांचे यश appeared first on पुढारी.
विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : आशिया खंडातील सर्वात खडतर आणि आव्हानात्मक असणारी आणि शरीराचा कस काढणारी सिंहगड-राजगड-तोरणा ही ५३ कि.मी. अल्ट्रा मॅरेथॉन शाहूवाडी येथील डॉ. झुंझार माने यांनी सलग ११ तास ३० मिनिटांत पूर्ण करुन यश मिळवले. SRT Ultra Marathon वेस्टर्न घाट असोसिएशनतर्फे या मॕरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आशिया खंडातील सर्वात खडतर म्हणून …
The post कोल्हापूर : एसआरटी अल्ट्रा मॕरेथॉन स्पर्धेत शाहूवाडी येथील डॉ. झुंझार माने यांचे यश appeared first on पुढारी.