रूफ टॉप हॉटेलवर बंदी आणण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा : विजय वडेट्टीवार
नागपूर, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील रूफ टॉप हॉटेलवर बंदी आणावी, यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.१५) विधानसभेत केली. लक्षवेधीवरील चर्चेवेळी वडेट्टीवार बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले की, मुंबई, पुण्यात हॉटेलला आग लागून अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत विमानतळजवळ ऑर्चिड हॉटेल आहे. तिथे रुफ टॉप हॉटेल आहे. त्याला परवानगी नाही. पुण्यातील 21 रूफ टॉप हॉटेलवर कारवाई केली. सहा लाखाचा दंड केला. नंतर तोडपाणी करून हॉटेल पुन्हा सुरू झाले आहेत. हे गंभीर आहे. आगीच्या घटना घडल्या की चर्चा होते. त्यामुळे सरकारने यासंदर्भात निर्णय घ्यावा. अन्यथा पुन्हा दुर्दैवी घटना घडतील. यासंदर्भात सरकारकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले.
हेही वाचा
Maharashtra Assembly Winter Session | मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ‘सलीम कुत्ता’सोबत ठाकरे गटाच्या बडगुजरांची पार्टी, विधानसभेत फोटो दाखवल्याने खळबळ
Maharashtra Assembly Winter Session : “फोटोसाठी एकत्र आलेल्या आमदारांचे चेहरे…”, रोहित पवारांची खोचक पोस्ट
Parliament Winter Session: खासदार निलंबनावरून संसदेत पुन्हा गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब
The post रूफ टॉप हॉटेलवर बंदी आणण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा : विजय वडेट्टीवार appeared first on पुढारी.
नागपूर, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील रूफ टॉप हॉटेलवर बंदी आणावी, यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.१५) विधानसभेत केली. लक्षवेधीवरील चर्चेवेळी वडेट्टीवार बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले की, मुंबई, पुण्यात हॉटेलला आग लागून अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत विमानतळजवळ ऑर्चिड हॉटेल आहे. तिथे रुफ टॉप हॉटेल आहे. त्याला …
The post रूफ टॉप हॉटेलवर बंदी आणण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा : विजय वडेट्टीवार appeared first on पुढारी.