युवा संघर्ष यात्रा लाठीमार; राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : युवा संघर्ष यात्रेवर नागपूर येथे पोलिसांनी युवकांना लाठीमार केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी अटक केली. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेससच्या (शरद पवार गट) महिला आघाडीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरूवारी (दि.14) आंदोलन केले. महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, शहर उपाध्यक्ष अनिल भोसले, कष्टकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, कार्याध्यक्षा शारदा चोकशी, स्वप्नाली आसोले, पूजा आल्हाट, सारिका हरगुडे, रेखा मोरे, किर्ती तोरणे, दीपाली केदारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आगामी निवडणुकीत जनता सरकारला धडा शिकवेल
ज्योती निंबाळकर म्हणाल्या की, युवा संघर्ष यात्रेद्वारे राज्यातून 800 किलोमीटर पायी प्रवास करून आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेचे मूलभूत प्रश्न घेतले. बेरोजगार युवक, गोरगरीब शेतकरी, महाराष्ट्रातील महिलांचे प्रश्न यावर सरकारने ठोस पावले उचलावी, यासाठी निवेदन सादर करण्यासाठी विधान भवनात जात असताना पोलिसांनी युवकांवर लाठी हल्ला केला. बेकायदेशीरपणे आंदोलनकर्त्यांना अटक केली. या अटकेचा आम्ही निषेध व्यक्त करतो. राज्यातील युवा वर्ग आगामी निवडणुकीत या जुलमी सरकारला योग्य तो धडा शिकवेल. पोलिसांकडून युवकांना झालेल्या लाठीमारचा काशिनाथ नखाते व राहुल आहेर यांनी निषेध केला. तसेच, याबाबत सरकारवर टीकास्त्र सोडले.
हेही वाचा
भाजप युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
Crime News : प्रेमसंबंधाला नकार दिला म्हणून त्याने केल अस काही
Pimpri News : परिचारिकांचे काळ्या फिती लावून काम
The post युवा संघर्ष यात्रा लाठीमार; राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन appeared first on पुढारी.
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : युवा संघर्ष यात्रेवर नागपूर येथे पोलिसांनी युवकांना लाठीमार केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी अटक केली. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेससच्या (शरद पवार गट) महिला आघाडीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरूवारी (दि.14) आंदोलन केले. महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, …
The post युवा संघर्ष यात्रा लाठीमार; राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन appeared first on पुढारी.