‘बिद्री’च्या अध्यक्षपदी के. पी. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी गणपतराव फराकटेंची निवड

बिद्री : पुढारी वृत्तसेवा बिद्री (ता.कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार के. पी. पाटील (मुधाळ) यांची पाचव्यांदा निवड झाली. तर उपाध्यक्षपदी गणपतराव गुंडू फराकटे (बोरवडे) यांची निवड करण्यात आली. विभागीय उपनिबंधक अरूण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना सभागृहात विशेष सभेत निवडी पार पडल्या. निवडीनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार श्री काकडे यांच्या … The post ‘बिद्री’च्या अध्यक्षपदी के. पी. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी गणपतराव फराकटेंची निवड appeared first on पुढारी.
‘बिद्री’च्या अध्यक्षपदी के. पी. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी गणपतराव फराकटेंची निवड


बिद्री : पुढारी वृत्तसेवा बिद्री (ता.कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार के. पी. पाटील (मुधाळ) यांची पाचव्यांदा निवड झाली. तर उपाध्यक्षपदी गणपतराव गुंडू फराकटे (बोरवडे) यांची निवड करण्यात आली. विभागीय उपनिबंधक अरूण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना सभागृहात विशेष सभेत निवडी पार पडल्या. निवडीनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार श्री काकडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
बिद्री साखर कारखान्याची सन २०२३ ते २८ या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज पाटील, बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील, माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई, संजयबाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ महालक्ष्मी शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व २५ जागा जिंकल्या होत्या. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचित संचालकांची बैठक आज सकाळी दहा वाजता कारखाना प्रधान कार्यालयात बोलाविण्यात आली होती.
अध्यक्षपदी के. पी. पाटील यांची निवड निश्चित होती. तर उपाध्यक्षपदाचे नाव असलेले बंद पाकीट जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, गोकूळचे संचालक युवराज पाटील, नाविद मुश्रीफ हे सभास्थळी घेऊन आले. यामध्ये उपाध्यक्षपदासाठी गणपतराव फराकटे यांचे नाव नेत्यांनी सुचवले. याला उपस्थित संचालकांनी एकमताने मंजुरी दिल्याने फराकटे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
अध्यक्षपदासाठी के. पी. पाटील यांचे नाव संचालक राजेंद्र पाटील यांनी सुचवले. त्याला संभाजी पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी गणपतराव फराकटे यांचे नाव संचालक पंडीत केणे यांनी सुचवले. त्याला डी. एस. पाटील यांनी अनुमोदन दिले.
निवडीनंतर बोलताना अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, चार तालुक्यांतील सभासदांनी मोठ्या मताधिक्याने निवडून देत आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. नूतन संचालक मंडळ व प्रशासनाच्या सहकार्यावर उस उत्पादकांना जास्तीत जास्त दर देवून त्यांच्या विश्वासाला जपण्याचे काम केले जाईल. कारखाना सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून भविष्यात विकासाच्या नवनवीन योजना कारखान्यात राबविण्याचा आपला मानस आहे.
यावेळी उपाध्यक्ष गणपतराव फराकटे, संचालक राजेंद्र मोरे, राजेंद्र पाटील, राजेंद्र भाटळे, उमेश भोईटे, डी. एस. पाटील, दिपक किल्लेदार, सुनील सुर्यवंशी, रणजित मुडुकशिवाले, प्रविणसिंह पाटील, रंगराव पाटील, रवींद्र पाटील, मधुकर देसाई, राहुल देसाई, पंडित केणे, धनाजी देसाई, सत्यजित जाधव, केरबा पाटील, संभाजी पाटील, रंजना पाटील, क्रांती ऊर्फ अरुंधती पाटील, रामचंद्र कांबळे, फिरोजखान पाटील, रावसाहेब खिल्लारी, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, चीफ अकौंटंट एस. ए. कुलकर्णी, सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : 

Shri Krishna Janmabhoomi Case : श्री कृष्ण जन्मभूमी वाद : ‘ईदगाह’ परिसराच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार 
Maharashtra Assembly Winter Session | मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ‘सलीम कुत्ता’सोबत ठाकरे गटाच्या बडगुजरांची पार्टी, विधानसभेत फोटो दाखवल्याने खळबळ

Rajasthan CM Oath Ceremony | राजस्थानात ‘भजन’ राज! १४ वे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांनी घेतली शपथ, पीएम मोदींची उपस्थिती

The post ‘बिद्री’च्या अध्यक्षपदी के. पी. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी गणपतराव फराकटेंची निवड appeared first on पुढारी.

बिद्री : पुढारी वृत्तसेवा बिद्री (ता.कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार के. पी. पाटील (मुधाळ) यांची पाचव्यांदा निवड झाली. तर उपाध्यक्षपदी गणपतराव गुंडू फराकटे (बोरवडे) यांची निवड करण्यात आली. विभागीय उपनिबंधक अरूण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना सभागृहात विशेष सभेत निवडी पार पडल्या. निवडीनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार श्री काकडे यांच्या …

The post ‘बिद्री’च्या अध्यक्षपदी के. पी. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी गणपतराव फराकटेंची निवड appeared first on पुढारी.

Go to Source