पिंपरी : सरकारी कर्मचार्‍यांच्या संपामुळे कामकाज ठप्प

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचार्‍यांनी गुरुवारपासून (दि.14) बेमुदत संप पुकारला आहे. या संपात शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, निगडी आणि भोसरी शिधापत्रिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे तेथील कामकाज ठप्प पडले. नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ असा … The post पिंपरी : सरकारी कर्मचार्‍यांच्या संपामुळे कामकाज ठप्प appeared first on पुढारी.

पिंपरी : सरकारी कर्मचार्‍यांच्या संपामुळे कामकाज ठप्प

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचार्‍यांनी गुरुवारपासून (दि.14) बेमुदत संप पुकारला आहे. या संपात शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, निगडी आणि भोसरी शिधापत्रिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे तेथील कामकाज ठप्प पडले. नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ असा नारा देत सरकारी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे.
यापूर्वी मार्च महिन्यात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते. संप मागे घेताना समिती नेमली होती. तीन महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, आठ महिने होऊनही कोणताही निर्णय न झाल्याने सरकारी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे संतप्त कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उपसले. दरम्यान, शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय, निगडी व भोसरी शिधापत्रिका कार्यालयातील बहुतांश तर, पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यामुळे या सर्व कार्यालयांच्या परिसरात शुकशुकाट दिसून येत होता. विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती घरी जावे लागले.
महापालिका कर्मचार्‍यांची संपाकडे पाठ
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी या संपाकडे पाठ फिरवली आहे. गुरुवारी झालेल्या संपात महापालिकेतील एकही कर्मचारी सहभागी झाला नाही. यासंदर्भात राज्य सरकारशी बोलणे सुरू आहे. तसेच, याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे यांनी दिली.
हेही वाचा

Pimpri News : परिचारिकांचे काळ्या फिती लावून काम
पवना धरणात जूनअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा
बॉलीवूडपटांच्या कमाईचा नवा उच्चांक!

 
The post पिंपरी : सरकारी कर्मचार्‍यांच्या संपामुळे कामकाज ठप्प appeared first on पुढारी.

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचार्‍यांनी गुरुवारपासून (दि.14) बेमुदत संप पुकारला आहे. या संपात शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, निगडी आणि भोसरी शिधापत्रिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे तेथील कामकाज ठप्प पडले. नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ असा …

The post पिंपरी : सरकारी कर्मचार्‍यांच्या संपामुळे कामकाज ठप्प appeared first on पुढारी.

Go to Source