‘सलीम कुत्ता’सोबत ठाकरे गटाच्या बडगुजरांची पार्टी, नेमकं प्रकरण काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा उजवा हात आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांकडून आज विधानसभेत जोरदार हल्लाबोल करण्यात आला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा उजवा हात असलेला सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. सलीम कुत्ता … The post ‘सलीम कुत्ता’सोबत ठाकरे गटाच्या बडगुजरांची पार्टी, नेमकं प्रकरण काय? appeared first on पुढारी.
‘सलीम कुत्ता’सोबत ठाकरे गटाच्या बडगुजरांची पार्टी, नेमकं प्रकरण काय?


पुढारी ऑनलाईन डेस्क : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा उजवा हात आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांकडून आज विधानसभेत जोरदार हल्लाबोल करण्यात आला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा उजवा हात असलेला सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. सलीम कुत्ता सध्या पॅरोलवर असून त्याच्यासोबत बडगुजर यांनी पार्टी केली, असा आरोप नितेश राणे यांनी केला. याबाबतचे फोटोही नितेश राणेंनी विधानसभेत दाखवल्याने एकच खळबळ उडाली.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, “बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी करण गंभीर आहे. आरोपीसोबत कोणी पार्टी करत असेल तर त्याची चौकशी होईल. ही चौकशी एसआयटीकडून करण्यात येईल. (Maharashtra Assembly Winter Session)
दादा भुसे, आशिष शेलार आक्रमक…
शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिकमधील महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सलीम कुत्तासोबत डान्स केल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी केला. त्याचबरोबर सलीम कुत्ता दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचेही म्हटले आहे. तर आशिष शेलार म्हणाले की, शिवसेना भवन उडवण्याचा कट असलेला आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्यानंतर त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही. या घटनांमुळे दहशतवाद्यांचा आत्मविश्वास वाढतो. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. दादा भुसे यांनी सुधाकर बडगुजर कोणाच्या संपर्कात होता? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.
Maharashtra Assembly Winter Session : एसआयटी चौकशी…
सलीम कुत्ता प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  आशिष शेलार आणि दादा भुसे यांनी जो मुद्दा मांडला आहे तो अतिशय गंभीर आहे. बॉम्बस्फोटात हात असलेला आणि देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी सलिम कुत्तासोबत पार्टी करणं गंभीर बाब आहे. तो पॅरोलरवर होता. पॅरोलवर असताना  पार्टी देखील करता येत नाही. आणि त्यानं पार्टी करायची आणि कोणीतरी पार्टीमध्ये जायचं आणि नाचायचं. हे अतिशय गंभीर आहे.  त्या कुत्ताशी काय संबध आहे हेही तपासले जाईल. त्याला कोणाचा वरदहस्त होता का, आशीर्वाद होता का हे पाहिले पाहिजे. ही चौकशी एसआयटीकडून करण्यात येईल. त्यासाठी एसआयटीला विशिष्ट काळाची मुदत दिली जाईल.”
हेही वाचा 

Maharashtra Assembly Winter Session : “फोटोसाठी एकत्र आलेल्या आमदारांचे चेहरे…”, रोहित पवारांची खोचक पोस्ट
Parliament Winter Session: खासदार निलंबनावरून संसदेत पुन्हा गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर सरकारने लेखी दिलेल्या आश्वासनावर काय कार्यवाही केली: मनोज जरांगे- पाटील
Suryakumar Yadav | टीम इंडियाला आणखी एक धक्का, क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमार यादव गंभीर जखमी
धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी : आमदार पडळकर यांची उपोषण समितीच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया
Parliament Security Breach : संसद सुरक्षा भंग प्रकरणी चारही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी

The post ‘सलीम कुत्ता’सोबत ठाकरे गटाच्या बडगुजरांची पार्टी, नेमकं प्रकरण काय? appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा उजवा हात आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांकडून आज विधानसभेत जोरदार हल्लाबोल करण्यात आला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा उजवा हात असलेला सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. सलीम कुत्ता …

The post ‘सलीम कुत्ता’सोबत ठाकरे गटाच्या बडगुजरांची पार्टी, नेमकं प्रकरण काय? appeared first on पुढारी.

Go to Source