चाहत्याला वाईट वागणूक दिल्याबद्दल बॉबी देओल ट्रोल
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल ( Bobby Deol ) त्याचा सुपरहिट ‘अॅनिमल’ चित्रपटाने चर्चेत आला आहे. हा चित्रपट जगभरात बॉक्स ऑफिसवर वर्ल्डवाईड ८०० कोंटीच्या घरात पोहोचणार आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्यातील मुलगा- वडील याच्या नात्यावर हा चित्रपट भाष्य करतोय. दरम्यान चित्रपटात बॉबी देओलने ‘अबरार’ खलनायकाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत त्याचा एकही डॉयलॉग नाही. परंतु, त्याचा अभिनयाची चर्चा रंगली आहे. एकिकडे चित्रपटातील भारदस्त अभिनय पाहून चाहत्यांनी त्याच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय. तर दुसरीकडे मात्र, फॅन्ससोबतच्या त्याच्या एका वाईट वागणूकीमुळे नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.
संबंधित बातम्या
Aishwarya Rai Deep fake Video : ब्ल्यू बिकिनीत ऐश्वर्या रायचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल
Shreyas Talpade : श्रेयस तळपदेसाठी चाहत्यांची प्रार्थना, नेटकऱ्यांनी अशा केल्या कॉमेंट्स
‘फायटर’ च्या यशासाठी Deepika Padukone नं घेतलं बालाजीचं दर्शन; कॅज्युअल लूक व्हायरल
‘अॅनिमल’ चित्रपटातील बॉबी देओलच्या खलनायक भूमिकेला चाहत्यांकडून खूपच प्रेम मिळालं. मात्र, त्याच्या एका व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. बॉबी देओल ( Bobby Deol ) नुकतेच एका दिल्ली विमान तळावर स्पॉट झाला आहे. यावेळी तो त्याच्या कामाच्या गडबडीत आणि घाईने जाताना दिसतोय. दरम्यानच त्याचा एक चाहता त्याच्याजवळ असतो आणि बॉबी गडबडीने स्वत: च्या हाताने त्याला बाजूला सरकवत पुढे निघून जातो. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी वेगळाच अर्थ काढत बॉबी देओलने चाहत्यांला धक्का दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, तसे नाहीही नसून त्याने गडबडीत चाहत्यांला फक्त बाजूला सरकवल्याचे निदर्शनास येत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी ‘अॅनिमल’मधील अभिनय आणि डॅशिग लूकचे भरभरून कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी कॉमेन्टस करताना त्याला ट्रोल केलं आहे. ‘अॅनिमल’च्या यशानंतर बॉबी देओलने फॅन्सना धक्का देत आहे?’, ‘आता तो घमेंडी बनला आहे?’, ‘त्याला चाहत्यांची किमंत नाही?’, ‘ …म्हणून फॅन्सना वाईट वागणूक देत आहे’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.
The post चाहत्याला वाईट वागणूक दिल्याबद्दल बॉबी देओल ट्रोल appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल ( Bobby Deol ) त्याचा सुपरहिट ‘अॅनिमल’ चित्रपटाने चर्चेत आला आहे. हा चित्रपट जगभरात बॉक्स ऑफिसवर वर्ल्डवाईड ८०० कोंटीच्या घरात पोहोचणार आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्यातील मुलगा- वडील याच्या नात्यावर हा चित्रपट भाष्य करतोय. दरम्यान चित्रपटात बॉबी देओलने ‘अबरार’ खलनायकाची भूमिका साकारली आहे. या …
The post चाहत्याला वाईट वागणूक दिल्याबद्दल बॉबी देओल ट्रोल appeared first on पुढारी.