Weather Update : पुणेकरांनो सांभाळून, थंडीची दुलई पसरणार
पुणे : पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात जोरदार सक्रिय झाल्याने उत्तर ते मध्य भारत गारठण्यास सुरुवात झाली आहे. तेथील किमान तापमान 5 ते 10 अंशांवर खाली आले आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप थंडी नाही. राज्यात 18 डिसेंबरपासून थंडी सुरू होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. शुक्रवारी उत्तर भारतातील बहुतेक भागांमध्ये किमान तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअस इतके खाली आले होते. पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी व दाट धुके आहे. 16 डिसेंबरपासून पश्चिम हिमालयीन क्षेत्रावर पश्चिमी चक्रवात तयार होत आहे. त्यामुळे राज्यात शीतलहरी येण्यास 18 तारीख उजाडणार आहे.
राज्याचे गुरुवारचे तापमान..
मुंबई 22.8, रत्नागिरी 21.5, पुणे 14.0, अहमदनगर 14.3, जळगाव 15, कोल्हापूर 17.5, महाबळेश्वर 13.5, मालेगाव 16.0, नाशिक 14.2, सांगली 17.1, सातारा 15.3 सोलापूर 17.8, छत्रपती संभाजीनगर 14.6, परभणी 15.5, नांदेड 16.6, बीड 15.2, अकोला 17.2, अमरावती 15.3, बुलढाणा 15, ब—ह्मपुरी 15.1, चंद्रपूर 13.6, गोंदिया 13.2, नागपूर 14.4, वाशिम 14.6, वर्धा 16, यवतमाळ 16.5.
हेही वाचा
Nashik News : जिद्द मनाची आवड वर्दीची, पहिल्याच प्रयत्नात श्रेया नौदलात भरती
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव : सप्तसुरांची उधळण अन् नादमय वादन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री केपी विश्वनाथन यांचे निधन
The post Weather Update : पुणेकरांनो सांभाळून, थंडीची दुलई पसरणार appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात जोरदार सक्रिय झाल्याने उत्तर ते मध्य भारत गारठण्यास सुरुवात झाली आहे. तेथील किमान तापमान 5 ते 10 अंशांवर खाली आले आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप थंडी नाही. राज्यात 18 डिसेंबरपासून थंडी सुरू होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. शुक्रवारी उत्तर भारतातील बहुतेक भागांमध्ये किमान तापमान 5 …
The post Weather Update : पुणेकरांनो सांभाळून, थंडीची दुलई पसरणार appeared first on पुढारी.