शेअर बाजारात गुंतवणूक करताय?, रिटेल गुंतवणूकदारांनी काय करावे, काय करु नये?
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई)
मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेअर्स अथवा सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्यास अनेकवेळा भाग पाडले जाते. यामुळे अनेक रिटेल गुंतवणूदारांची फसवणूक होते. या पार्श्वभूमीवर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) ने रिटेल गुंतवणूकदारांनी काय करावे, काय करु नये? यासाठी ॲडव्हाजरी जारी केली आहे. जाणून घेऊया त्याविषयी….
रिटेल गुंतवणूकदारांनी नेमके काय करावे, काय करु नये?
१. फक्त सेबीकडे नोंदणी असलेल्या मध्यस्थांशीच व्यवहार करावा. उत्पादनाची आणि त्याच्याशी निगडित जोखमींची पूर्ण माहिती घेऊन मगच गुंतवणूक करावी.
२. शेअर बाजारात निश्चित/खात्रीशीर / नियमित मोबदला/भांडवल संरक्षक योजना देऊ करण्यास परवानगी नाही. मग त्या लेखी स्वरूपात असोत किंवा तोंडी स्वरूपात असोत. तुम्ही देऊ करत असलेल्या फंड्स/सिक्युरिटींवरील व्याज देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कर्जकरार ब्रोकर किंवा त्यांचे प्रतिनिधी करू शकत नाहीत.
३. मोठा मोबदला/नफा मिळवून देण्याचा वायदा करणाऱ्या शेअर्स/सिक्युरिटीजमध्ये व्यवहार करण्याचे प्रलोभन दाखवणाऱ्या ईमेल्स, एसएमएस आणि ऑनलाइन व्हिडिओंना अजिबात बळी पडू नका.
४. ‘केवायसी’ कागदपत्रांमधील सर्व आवश्यक तपशील तुम्ही स्वतःच भरा आणि ब्रोकरकडून तुमच्या ‘केवायसी’ कागदपत्रांची योग्य स्वाक्षऱ्या असलेली प्रत ब्रोकरकडून घेण्याचेही लक्षात ठेवा.
५. तुम्हाला कम्प्युटरचे चांगले ज्ञान असेल आणि तुमचे स्वतःचे ई-मेल खाते असेल तरच इलेक्ट्रॉनिक (ई-मेल) काँट्रॅक्ट नोट्स/वित्तीय पत्रके ह्यांचा पर्याय स्वीकारा.
६. तुमचा लॉगइन आयडी, पासवर्ड, ओटीपी, टीपीआयएन कोणत्याही परिस्थितीत, अन्य कोणत्याही व्यक्तीला, ह्यात ब्रोकरकडील कर्मचाऱ्यांचाही समावेश होतो, सांगू नका.
७. तुमचे सर्व ट्रेड्स तुमच्या सूचनेनुसारच कार्यान्वित होतील ह्याची खात्री करा. एनएसईच्या वेबसाइटवर ट्रेड व्हेरिफिकेशन (पडताळणी) सुविधाही उपलब्ध आहे.
७. तुमचे सर्व ट्रेड्स तुमच्या सूचनेनुसारच कार्यान्वित होतील याची खात्री करा. एनएसईच्या वेबसाइटवर ट्रेड व्हेरिफिकेशन (पडताळणी) सुविधाही उपलब्ध आहे.
८. तुम्हाला फंड्स व सिक्युरिटींद्वारे मिळणारे पैसे (पेआउट) सेट्लमेंटनंतर एका कार्यकारी दिवसाच्या आत तुमच्या हातात येतील याची खात्री करा. तुम्ही फंड्ससाठी रनिंग खात्याचा पर्याय स्वीकारला असेल, तर तुमचे खाते महिन्याच्या/तिमाहीच्या (जो पर्याय स्वीकारला असेल त्यानुसार) पहिल्या शुक्रवारी सेट्ल झाल्याची खात्री करा.
९. रोखीतील व्यवहारांना मनाई आहे. कोणत्याही सिक्युरिटी ब्रोकरकडे किंवा ब्रोकरच्या सहयोगींकडे किंवा ब्रोकरच्या अधिकृत व्यक्तींकडे ठेवू नका. ब्रोकरला दिले जाणारे मार्जिन/तारण म्हणून सिक्युरिटीजचे हस्तांतर कधीही करू नका आणि ह्या सिक्युरिटीज केवळ क्लाएंटच्या डिमॅट खात्यातूनच तारण ठेवल्या जाणे बंधनकारक आहे.
१०. डिलिव्हरी/सेंटलमेंट कारणांसाठी, मार्जिन्सच्या उद्देशाने सिक्युरिटीज तारण ठेवण्यासाठी आणि एक्स्चेंज प्लॅटफॉर्मवरील म्युच्युअल फंड ओपन ऑफर व्यवहारांसाठी सिक्युरिटींचे हस्तांतर करायचे असेल तर केवळ डीडीपीआयचा पर्याय स्वीकारा. डीडीपीआय/पीओए ऐच्छिक आहेत आणि खाते उघडण्यासाठी यांचा आग्रह धरला जाऊ शकत नाही.
११. तुमचा मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी नेहमीच ब्रोकरकडे अद्ययावत करत राहा. ब्रोकर/एक्स्चेंजमार्फत पाठवण्यात आलेल्या काँट्रॅक्ट नोट्स/ट्रेड्स/ फंड्स आणि सिक्युरिटी बॅलन्स ह्यासंदर्भातील एसएमएस/ई-मेल्स कधीच दुर्लक्षित राहणार नाहीत ह्याची काळजी घ्या. त्यातील तपशिलांची पडताळणी करून घ्या आणि काही विसंगती आढळल्यास, त्वरित ब्रोकरला, लेखी स्वरूपात, कळवा.
१२. ब्रोकरला पैशांचे हस्तांतर करण्यापूर्वी कृपया ब्रोकरच्या बँक खात्याच्या तपशिलांची पडताळणी ब्रोकर/एक्स्चेंजच्या वेबसाइटवरून करा.
१३. तुमच्या ब्रोकरने पैसे बुडवले आणि त्याचा व्यवहार एक्स्चेंजवर झालेला नसेल, तर ब्रोकरला कोणत्याही व्यवस्थेखाली / परतफेडीचा वायदा करणाऱ्या कराराखाली दिलेल्या रकमेचा दावा एक्स्चेंजद्वारे स्वीकारला जाणार नाही.
१४. गुंतवणूकदार जागरूकतेविषयी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी यावर भेट द्या
www.nseindia.com/invest/investors-home
संबंधित बातम्या
बाजाराची विक्रमी घौडदौड कायम, सेन्सेक्स ७०,८०० वर, निफ्टी २१,२५० पार
छोट्या गुंतवणूकदारांनी डेरिव्हेटिव्हमध्ये गुंतवणूक का करू नये? NSE च्या सीईओंचा सल्ला
BSE Sensex च्या निर्देशांकातील 10 हजार ते 70 हजारपर्यंतचे प्रमुख टप्पे
चतूर गुंतवणूकदार व्हा
खात्रीशीर मोबदला किंवा निश्चित मोबदल्याचा वायदा कोणीही करू शकत नाही.
तुमची गुंतवणूक पणाला लागलेली आहे, त्यामुळे सावध राहा.
इक्विटी व डेरिएटिव्ह्ज बाजारांमधील लेखी किंवा तोंडी वायद्यांवर कधीही विश्वास ठेवू नका.
कोणतेही उपकायदे, नियम व नियमने तसेच सेबी / एक्स्चेंज यांच्या परिपत्रकांनुसार परवानगी नसलेल्या कोणत्याही व्यवसाय/कृतींमध्ये गुंतवणूक करू नका. यामध्ये अनधिकृत संकलनात्मक गुंतवणूक/पोर्टफोलिओ व्यवस्थापन यांच्या योजना, निश्चित मोबदला/पेमेंट्स यांचे वायदे करणाऱ्या सूचक/हमी देणाऱ्या योजना आदींचाही समावेश होतो.
बँक टेस्टिंग किंवा दाव्यांवर आधारित विशिष्ट क्लुप्त्यांच्या जोरावर, पूर्वीसारखाच मोबदला भविष्यातही मिळू शकेल, अशी ग्वाही देणाऱ्या व त्यायोगे गुंतवणुकींवर प्रचंड मोबदला मिळवून देण्याचे आकर्षण दाखवणाऱ्या दाव्यांना भुलू नका.
अशा योजनांमध्ये केलेली कोणतीही गुंतवणूक एक्स्चेंजकडून भरपाई मिळवण्यास पात्र ठरू शकणार नाही.
‘हे’ आहे महत्त्वाचे
१. डब्बा ट्रेडिंग बेकायदा आहे.
२. तुमचा मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी नेहमीच अद्ययावत ठेवा.
३. पीओए बंधनकारक नसलेले (नॉन-मॅण्डेटरी) दस्तावेज आहे का?
६. जोखीम मोबदला रूपरेखेचे विश्लेषण
एनएसई इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.
<https://www.nseindia.com/invest/be-a-smart-investor>
‘हे’ जरूर लक्षात ठेवा
फोनकॉल्स, एसएमएस, ईमेल्स, यूट्यूब व्हिडिओ, टेलिग्राम चॅनल आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या, अनधिकृत/अनोंदणीकृत घटकांनी प्रसृत केलेल्या अनाहूत शेअर टिप/शिफारशींचा आधार घेऊन, चतूर गुंतवणूकदार ट्रेड करत नाही.
सिक्युरिटी बाजारात निश्चित/खात्रीशीर मोबदला देऊ करणाऱ्या योजनांमध्ये चतूर गुंतवणूकदार पैसे गुंतवत नाहीत.
चतूर गुंतवणूकदार स्टॉकब्रोकरकडे निधी निष्क्रिय ठेवत नाहीत आणि स्टॉकब्रोकरला सिक्युरिटी हस्तांतरितही करत नाही.
वेगवेगळ्या ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करण्यासाठी ज्ञान, अनुभव व जोखीम पत्करण्याची ताकद आवश्यक असते याचे भान चतूर गुंतवणूकदाराला असते आणि ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करण्यासाठी प्रत्येकाने माहितीपूर्ण निर्णय घेतले पाहिजेत हे त्याला माहीत असते.
चतूर गुंतवणूकदार स्वत:चे लॉगइन तपशील (यूजर आयडी व पासवर्ड) कोणालाही सांगत नाही.
चतूर गुंतवणूकदार स्ट्राँग (अंदाज बांधण्यास कठीण) पासवर्ड ठेवतो, नियमितपणे पासवर्ड बदलतो, पासवर्ड कोठेही लिहून उघड्यावर टाकत नाही.
चतूर गुंतवणूकदार प्रत्येक ट्रेडिंग सत्रानंतर लॉग आउट करण्यास विसरत नाही आणि ‘रिमेंबर पासवर्ड’ हा पर्याय कधीही निवडत नाही.
स्टॉकब्रोकरला दिलेले निवासाचा पत्ता, मोबाइल क्रमांक व ईमेल आयडी ह्यांसारखे संपर्काचे तपशील चतूर गुंतवणूकदार नेहमीच अद्ययावत ठेवतो.
शेअर बाजारात गुंतवणूक करताना छोट्या गुंतवणूकदारांनी कोणतीही जोखीम घेऊ नये. सकाळी शेअर घेऊन संध्याकाळी विकू नका. हा T20 सामना नाही. याला गुंतवणूक म्हणत नाहीत. यात जोखीम आहे. ज्यात गुंतवणूक करत आहात त्यात जोखीम आहे की नाही. याची तज्ज्ञांकडून माहिती घ्या. पैसे तुमचे आहेत. कंपनी कोणतीही असो. माहिती घ्या. त्यात माहीर झाल्यानंतर गुंतवणुकीकडे वळा.
आशिषकुमार चौहान, एमडी आणि सीईओ, एनएसई
The post शेअर बाजारात गुंतवणूक करताय?, रिटेल गुंतवणूकदारांनी काय करावे, काय करु नये? appeared first on पुढारी.
मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेअर्स अथवा सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्यास अनेकवेळा भाग पाडले जाते. यामुळे अनेक रिटेल गुंतवणूदारांची फसवणूक होते. या पार्श्वभूमीवर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) ने रिटेल गुंतवणूकदारांनी काय करावे, काय करु नये? यासाठी ॲडव्हाजरी जारी केली आहे. जाणून घेऊया त्याविषयी…. रिटेल गुंतवणूकदारांनी नेमके काय करावे, काय करु नये? १. फक्त सेबीकडे नोंदणी …
The post शेअर बाजारात गुंतवणूक करताय?, रिटेल गुंतवणूकदारांनी काय करावे, काय करु नये? appeared first on पुढारी.