शाहूवाडी तालुक्यातील सावे येथे बिबट्याच्या हल्ल्यात १० बकरी ठार

सरूड ; पुढारी वृत्तसेवा शाहूवाडी तालुक्यातील सावे येथे खासगी मालकीच्या शेतात विश्रांतीस बसविलेल्या मेंढरांच्या कळपावर बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात १० बकरी ठार झाल्‍या आहेत. गुरूवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास स्थानिक थोरला माळ परिसरात ही घटना घडली. यामध्ये ईश्वरा वग्रे (रा. सोनवडे, ता. शाहूवाडी) या मेंढपाळाचे सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा … The post शाहूवाडी तालुक्यातील सावे येथे बिबट्याच्या हल्ल्यात १० बकरी ठार appeared first on पुढारी.

शाहूवाडी तालुक्यातील सावे येथे बिबट्याच्या हल्ल्यात १० बकरी ठार

सरूड ; पुढारी वृत्तसेवा शाहूवाडी तालुक्यातील सावे येथे खासगी मालकीच्या शेतात विश्रांतीस बसविलेल्या मेंढरांच्या कळपावर बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात १० बकरी ठार झाल्‍या आहेत. गुरूवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास स्थानिक थोरला माळ परिसरात ही घटना घडली. यामध्ये ईश्वरा वग्रे (रा. सोनवडे, ता. शाहूवाडी) या मेंढपाळाचे सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, ईश्वरा वग्रे हा मेंढपाळ सावे परिसरात मेंढरांचा कळप चरण्यासाठी घेऊन गेला होता. यावेळी थोरला माळ परिसरातील संदीप पाटील यांच्या मालकीच्या शेतात रात्री विश्रांतीसाठी मेंढरांचा कळप बसविला होता.
यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्या सदृश प्राण्याने या मेंढरांच्या कळपात घुसून हल्ला चढवला, यात दहा मेंढरांचा बिबट्याने गळा घोटला आहे. गतवर्षीही याच परिसरात बिबट्याने हल्ला करून पाच शेळ्यांचा फडशा पाडला होता. ही आठवणही या घटनेने ताजी झाली.
हल्ल्याची घटना उजेडात आल्यानंतर दोन तास उलटूनही शाहूवाडी वन विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसल्याने स्थानिक गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपात वनविभागाचे कर्मचारी देखील सहभागी झाल्यामुळे घटनास्थळी पथक पोहोचण्यास उशीर झाल्याचे वनपाल मेहबूब नायकवडी यांनी सांगितले. वनरक्षक आशिष पाटील, वनसेवक रामचंद्र केसरे, शंकर लव्हटे यांच्या पथकाने रात्री आठ वाजता घटनास्थळी पोहचून हल्ल्याच्या घटनेची माहिती वरिष्ठांना कळविली. यावेळी मृत बकऱ्यांच्या तोंड, मान, पोट अशा शरीराच्या भागावर हल्लेखोर प्राण्याने जबर चावा घेतल्याचे आढळून आले.
आज (शुक्रवारी) सकाळी शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मृत मेंढरांचे शवविच्छेदन तसेच घटनेचा पंचनामा आदी प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल. मेंढरांवरचा हा हल्ला बिबट्या, तरस की अन्य कोणत्या वन्य प्राण्याने केला, याची नेमकी माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, अशी माहितीही वनपाल मेहबूब नायकवडी यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.
The post शाहूवाडी तालुक्यातील सावे येथे बिबट्याच्या हल्ल्यात १० बकरी ठार appeared first on पुढारी.

सरूड ; पुढारी वृत्तसेवा शाहूवाडी तालुक्यातील सावे येथे खासगी मालकीच्या शेतात विश्रांतीस बसविलेल्या मेंढरांच्या कळपावर बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात १० बकरी ठार झाल्‍या आहेत. गुरूवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास स्थानिक थोरला माळ परिसरात ही घटना घडली. यामध्ये ईश्वरा वग्रे (रा. सोनवडे, ता. शाहूवाडी) या मेंढपाळाचे सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा …

The post शाहूवाडी तालुक्यातील सावे येथे बिबट्याच्या हल्ल्यात १० बकरी ठार appeared first on पुढारी.

Go to Source