Pune Crime News : दहशत माजविणार्या गुंडावर ‘एमपीडीए’ कारवाई
पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारती विद्यापीठ परिसरात दहशत माजविणार्या गुंडाविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. सागर संदीप शर्मा उर्फ भोवते (वय 20, रा. एसआरए वसाहत, लेकटाऊन सोसायटीजवळ, भारती विद्यापीठ) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. शर्माविरुद्ध गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देत नव्हते.
शर्माविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड आणि गुन्हे प्रतिबंधक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी तयार केला होता.पोलिस आयुक्तांकडे
प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला. पोलिस आयुक्तांनी प्रस्ताव मंजूर केला. शर्माला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले. पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी शहरातील 69 गुंडांविरुद्ध एमपीडीए कारवाई केली आहे.
हेही वाचा
शांतता! कोर्ट बंद आहे!! एक महिन्यापासून न्यायाधीशांची प्रतीक्षा
Nashik Crime : सिडकोतील पवननगर भागात गोळीबार
चीनमध्ये पाण्याखाली सहाशे वर्षे जुने शहर
The post Pune Crime News : दहशत माजविणार्या गुंडावर ‘एमपीडीए’ कारवाई appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारती विद्यापीठ परिसरात दहशत माजविणार्या गुंडाविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. सागर संदीप शर्मा उर्फ भोवते (वय 20, रा. एसआरए वसाहत, लेकटाऊन सोसायटीजवळ, भारती विद्यापीठ) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. शर्माविरुद्ध गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या दहशतीमुळे …
The post Pune Crime News : दहशत माजविणार्या गुंडावर ‘एमपीडीए’ कारवाई appeared first on पुढारी.