गायब… चक्क अदृश्य करणारे उपकरण!

बीजिंग : चिन्यांच्या अजब देशातील हे ‘लेटेष्ट’ अजब! तेथील संशोधकांनी एक असे उपकरण बनवले आहे ज्याच्या सहाय्याने एखाद्या वस्तूच्या आरपार पाहिले जाऊ शकते. या उपकरणामुळे एखादा माणूसही जणू काही ‘अद़ृश्य’ होऊन जातो! या उपकरणाचा एक व्हिडीओही आता समोर आला आहे. ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील अनिल कपूरच्या ‘गायब’ करणार्‍या घड्याळासारख्या उपकरणांचे सर्वसामान्यांपासून ते संशोधकांपर्यंत अनेकांना आकर्षण आहे. … The post गायब… चक्क अदृश्य करणारे उपकरण! appeared first on पुढारी.

गायब… चक्क अदृश्य करणारे उपकरण!

बीजिंग : चिन्यांच्या अजब देशातील हे ‘लेटेष्ट’ अजब! तेथील संशोधकांनी एक असे उपकरण बनवले आहे ज्याच्या सहाय्याने एखाद्या वस्तूच्या आरपार पाहिले जाऊ शकते. या उपकरणामुळे एखादा माणूसही जणू काही ‘अद़ृश्य’ होऊन जातो! या उपकरणाचा एक व्हिडीओही आता समोर आला आहे.
‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील अनिल कपूरच्या ‘गायब’ करणार्‍या घड्याळासारख्या उपकरणांचे सर्वसामान्यांपासून ते संशोधकांपर्यंत अनेकांना आकर्षण आहे. त्यामुळेच प्रकाशकिरण आरपार जाऊ शकणार्‍या उपकरणांची निर्मिती करण्याचे अनेक प्रयत्न आतापर्यंत होत आलेले आहेत. आता चिनी संशोधक चू जुन्हाओ यांनी नवे पाऊल टाकले आहे. त्यांनी ऑप्टिकल टेक्नॉलॉजीला ‘नेक्स्ट लेव्हल’ला नेण्याचा यामधून प्रयत्न केला आहे.
‘हॅरी पॉटर’सारख्या चित्रपटांमध्ये आपण पाहतो की काही लोक एखादा झगा अंगावर चढवताच गायब होऊन जातात. तसाच हा प्रकार आहे. मात्र, हा पोशाख नसून एका चौकटीत असलेला पडदा आहे. त्यामधून आरपार पाहता येऊ शकते. एखादी भिंत आणि ही चौकट यांच्या दरम्यान माणूस उभा असेल तर त्याच्याही आरपार जाऊन मागील भिंत पाहता येऊ शकते. हे उपकरण प्रकाशाला नियंत्रित करते. त्यामध्ये टेंजिबल सोल्युशनचा वापर करून प्रकाशकिरणांमध्ये बदल केला जातो.
ही एक ‘कटिंग-एज टेक्नॉलॉजी’ आहे, जिचा वापर लोकांच्या नजरेत धूळफेक करण्यासाठी केला जाऊ शकतो. या तंत्राचा वापर सुरक्षा व्यवस्थेसाठी तसेच गुप्त निगराणीसाठी केला जाऊ शकतो. अशा तंत्राने अनेक उपकरणे बनवली जाऊ शकतात. इन्स्टाग्रामवर त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दिसते की या उपकरणाच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीचे पाय गायब होऊन त्याच्या मागे असणारी भिंत दिसू लागते.
The post गायब… चक्क अदृश्य करणारे उपकरण! appeared first on पुढारी.

बीजिंग : चिन्यांच्या अजब देशातील हे ‘लेटेष्ट’ अजब! तेथील संशोधकांनी एक असे उपकरण बनवले आहे ज्याच्या सहाय्याने एखाद्या वस्तूच्या आरपार पाहिले जाऊ शकते. या उपकरणामुळे एखादा माणूसही जणू काही ‘अद़ृश्य’ होऊन जातो! या उपकरणाचा एक व्हिडीओही आता समोर आला आहे. ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील अनिल कपूरच्या ‘गायब’ करणार्‍या घड्याळासारख्या उपकरणांचे सर्वसामान्यांपासून ते संशोधकांपर्यंत अनेकांना आकर्षण आहे. …

The post गायब… चक्क अदृश्य करणारे उपकरण! appeared first on पुढारी.

Go to Source