छत्तीसगड सीमेवर चकमक; दोन नक्षलवादी ठार

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील मोहला व मानपूर तालुक्यातील बोधीटोला गावाजवळ झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांनी आज दोन नक्षल्यांना कंठस्नान घातले.
यातील एका नक्षल्याचे नाव दुर्गेश वट्टी असे असून तो कसनसूर दलमचा उपकमांडर होता. 1 मे 2019 रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा गावाजवळ नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 पोलिस शहीद झाले होते. या हत्याकांडाचा दुर्गेश वट्टी हा मुख्य सूत्रधार होता. दुसर्या नक्षल्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दोन्ही नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोली येथे आणण्यात आले आहेत.
पोलिसांनी घटनास्थळावरून एक एके 47 आणि एक एसएलआर बंदूक ताब्यात घेतल्या आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. घटनास्थळ हे धानोरा तालुक्यातील गोडलवाही पोलिस ठाण्यापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे.
The post छत्तीसगड सीमेवर चकमक; दोन नक्षलवादी ठार appeared first on पुढारी.
गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील मोहला व मानपूर तालुक्यातील बोधीटोला गावाजवळ झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांनी आज दोन नक्षल्यांना कंठस्नान घातले. यातील एका नक्षल्याचे नाव दुर्गेश वट्टी असे असून तो कसनसूर दलमचा उपकमांडर होता. 1 मे 2019 रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा गावाजवळ नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 पोलिस शहीद झाले होते. या हत्याकांडाचा …
The post छत्तीसगड सीमेवर चकमक; दोन नक्षलवादी ठार appeared first on पुढारी.
