श्रीकृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह मशीद
मथुरेतील शाही ईदगाह मशिदीच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण यांची जन्मभूमी आहे. त्यामुळे येथून मशीद हटविण्याची मागणी हिंदू पक्षकारांनी केली आहे. न्यायालयानेही पुरातत्त्व खात्याच्या वतीने मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीबाबत थोडक्यात माहिती.
अनेक वर्षांपासून खटला
श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ, शाही मशीद ईदगाह ट्रस्ट यांच्यासह काही मुसलमानांमध्ये मथुरेतील जागेवरून अनेक वर्षांपासून दिवाणी खटला सुरू आहे.
मशिदीमध्ये देवतांची प्रतीके
मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होेते. मशिदीमध्ये हिंदू मंदिराच्या प्रतिकृती आहेत. कमळाच्या आकाराचे स्तंभही आहेत. मशिदीमध्ये हिंदू देव-देवतांचे प्रतीक मानले जाणार्या शेषनागाची प्रतिकृतीही असल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केला आहे.
1670 : औरंगजेबाने केशवदेव मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद बांधल्याचे याचिककर्त्यांचे म्हणणे आहे.
1935 मध्ये वाराणसीतील हिंदू राजाला न्यायालायने मशिदीच्या जागेबाबतचा कायदेशीर अधिकार दिला होता.
1951 : या जागेवर श्रीकृष्ण मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
1958 : श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघाची स्थापना झाली. सेवा संघाकडे मशिदीच्या जागेच्या मालकीचे अधिकार नव्हते.
1964 : सेवा संघाने जमिनीच्या मालकीबाबत न्यायालयात धाव घेतली.
संपूर्ण जागेवरच दावा
हिंदू याचिकाकर्त्यांनी या समझोत्यालाच आव्हान दिले असून, संपूर्ण जमीन परत मागितली आहे. मशिदीचे बांधकाम बेकायदा करण्यात आले असून, या जागेवरून मशीद हटविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
ज्ञानवापीच्या धर्तीवर सर्वेक्षण
बनारस येथील ज्ञानवापी मशिदीवर 1991 साली हिंदू पक्षकारांनी दावा सांगितला आहे. वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापीमध्ये पुरातत्त्व खात्याच्या वतीने सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. त्याच धर्तीवर आता मथुरेतील मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
The post श्रीकृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह मशीद appeared first on पुढारी.
मथुरेतील शाही ईदगाह मशिदीच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण यांची जन्मभूमी आहे. त्यामुळे येथून मशीद हटविण्याची मागणी हिंदू पक्षकारांनी केली आहे. न्यायालयानेही पुरातत्त्व खात्याच्या वतीने मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीबाबत थोडक्यात माहिती. अनेक वर्षांपासून खटला श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ, शाही मशीद ईदगाह ट्रस्ट यांच्यासह काही मुसलमानांमध्ये मथुरेतील जागेवरून अनेक वर्षांपासून दिवाणी …
The post श्रीकृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह मशीद appeared first on पुढारी.