संसद सुरक्षा भंग प्रकरणी चारही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील चारही आरोपींना पटियाला हाऊस कोर्टात सादर केले. या चौघांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संसदेची सुरक्षा भंग हा एक सुनियोजीत कट असल्याने चारही आरोपींना मुंबई, म्हैसूर आणि लखनऊला चौकशीसाठी नेण्यात येणार आहे. असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. संसद सुरक्षा भंग प्रकरणातील आरोपींना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले होते.
संसद सुरक्षा भंग प्रकरणातील सागर शर्मा, डी मनोरंजन, नीलम सिंह, अमोल शिंदे या चारही आरोपींवर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गुरुवारी (दि. 14) संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील आरोपींना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पटियाला हाऊस कोर्टात सादर केले. पोलीस आणि आरोपी अशा दोन्ही बाजु कोर्टाने ऐकून घेतल्या. आरोपींनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरेही ऐकली. पोलिसांनी 15 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी पटियाला हाऊस कोर्टाकडे केली होती. यानंतर चारही आरोपींना 7 दिवसांची दिल्ली पोलिसांच्या विशेष कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या चौकशीदरम्यान लोकसभेतील सुरक्षा भंगाच्या घटनेची जबाबदारी सर्व आरोपींनी स्वीकारल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, संसद सुरक्षा भंग प्रकरणातील फरार आरोपी ललित झा हा या संपूर्ण कटाचा सूत्रधार असल्याचा संशय आहे. मात्र, ललित झा याला पकडल्यानंतरच याबाबत आणखी येऊ शकेल, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार ललित झा याने घटना घडवून आणण्याची तारीख ठरवली होती. तसेच सर्वांना गुरुग्राममध्ये बैठकीसाठी बोलावले होते. घटना घडण्यापूर्वी ललितने स्वतः चारही आरोपींचे फोन ताब्यात घेतले आणि तेथून पळ काढला, अशीही माहिती पोलिसांना मिळाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. दरम्यान, याच प्रकरणात लोकसभा सचिवालयाने 8 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
The post संसद सुरक्षा भंग प्रकरणी चारही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी appeared first on पुढारी.
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील चारही आरोपींना पटियाला हाऊस कोर्टात सादर केले. या चौघांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संसदेची सुरक्षा भंग हा एक सुनियोजीत कट असल्याने चारही आरोपींना मुंबई, म्हैसूर आणि लखनऊला चौकशीसाठी नेण्यात येणार आहे. असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. संसद सुरक्षा भंग प्रकरणातील आरोपींना दिल्ली पोलिसांच्या …
The post संसद सुरक्षा भंग प्रकरणी चारही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी appeared first on पुढारी.