जळगाव : यावल तालुक्यातील दोघांवर स्थानबध्दतेची कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव, पुढारी वृत्तसेवा : यावल तालुक्यातील अट्रावल आणि एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. एकाला कोल्हापूर तर दुसऱ्याला अमरावती कारगृहात रवाना करण्याचे आदेश आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. याबाबतची माहिती एल. सी. बी. पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी १४ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.
यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवाकर उर्फ पिंटू टोपलू तायडे (वय-४१ रा. अट्रावल ता. यावल) आणि एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील गुन्हेगार (भिकन रमेश कोळी वय-३५ रा. उत्राण ता. एरंडोल) या दोघांना स्थानबद्ध करण्याचा आदेश पोलीस ठाण्याच्या वतीने जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागात देण्यात आला.
दरम्यान या प्रस्तावाचे अवलोकन करत हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजूरीसाठी पाठविण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दोघांवर स्थानबध्दतेच्या कारवाईला मंजुरी दिली आहे. यात गुन्हेगार दिवाकर उर्फ पिंटू टोपलु तायडे याला कोल्हापूर येथील कारागृहात तर दुसरा गुन्हेगार भिकन रमेश कोळी याला अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे.
यातील भिकन रमेश कोळी हा नीलोन कंपनीच्या कामगारांमध्ये आंदोलन तसेच व्यवस्थापनकडे खंडणी मागणी त्याचप्रमाणे कोळी बांधवांच्या जळगावच्या उपोषणाच्या वेळी कलेक्टर याच्या दालनासमोर अंगावर रॉकेल ओतून घेणे अर्वाची व अश्लील घोषणाबाजी यासारख्या गुन्ह्यांमुळे त्याला कारवाईला सामोरे जावे लागले.
The post जळगाव : यावल तालुक्यातील दोघांवर स्थानबध्दतेची कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश appeared first on पुढारी.
जळगाव, पुढारी वृत्तसेवा : यावल तालुक्यातील अट्रावल आणि एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. एकाला कोल्हापूर तर दुसऱ्याला अमरावती कारगृहात रवाना करण्याचे आदेश आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. याबाबतची माहिती एल. सी. बी. पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी १४ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिध्दीपत्रकान्वये …
The post जळगाव : यावल तालुक्यातील दोघांवर स्थानबध्दतेची कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश appeared first on पुढारी.