नागपूर : शिवसेना-शिंदे गटाच्या पूर्व विदर्भ संघटकपदी किरण पांडव यांची नियुक्ती

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना शिंदे गटाच्या पूर्व विदर्भ संघटकपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गडचिरोली जिल्हा पालकमंत्री असतानापासूनचे निकटवर्तीय युवा नेते किरण पांडव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे आयोजित एका छोटेखानी समारंभात पांडव यांना नियुक्तीचे पत्र दिले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन … The post नागपूर : शिवसेना-शिंदे गटाच्या पूर्व विदर्भ संघटकपदी किरण पांडव यांची नियुक्ती appeared first on पुढारी.

नागपूर : शिवसेना-शिंदे गटाच्या पूर्व विदर्भ संघटकपदी किरण पांडव यांची नियुक्ती

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना शिंदे गटाच्या पूर्व विदर्भ संघटकपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गडचिरोली जिल्हा पालकमंत्री असतानापासूनचे निकटवर्तीय युवा नेते किरण पांडव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे आयोजित एका छोटेखानी समारंभात पांडव यांना नियुक्तीचे पत्र दिले.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबुतीच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची समजली जात आहे. ओबीसी चेहेरा असलेले पांडव यांची अलिकडेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत सातत्याने ओबीसी प्रश्नी बैठकही झाली. शिवसेनेतील फुटीनंतर पूर्व विदर्भात शिंदे यांना ताकद देण्यात आणि पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी पांडव महत्वाची भूमिका वठवित आहेत. पांडव यांच्या नियुक्ती बद्दल खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्यासह शिवसेनेचे पूर्व विदर्भातील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. पांडव यांनी यापूर्वी शिवसेनेच्या तिकिटावर नागपूर जिल्ह्यातील काटोल व दक्षिण नागपूर मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. पूर्व विदर्भात शिवसेनेच्या संघटन वाढीसाठी पांडव यांनी आजवर महत्वाची भूमिका वठविली आहे.
The post नागपूर : शिवसेना-शिंदे गटाच्या पूर्व विदर्भ संघटकपदी किरण पांडव यांची नियुक्ती appeared first on पुढारी.

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना शिंदे गटाच्या पूर्व विदर्भ संघटकपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गडचिरोली जिल्हा पालकमंत्री असतानापासूनचे निकटवर्तीय युवा नेते किरण पांडव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे आयोजित एका छोटेखानी समारंभात पांडव यांना नियुक्तीचे पत्र दिले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन …

The post नागपूर : शिवसेना-शिंदे गटाच्या पूर्व विदर्भ संघटकपदी किरण पांडव यांची नियुक्ती appeared first on पुढारी.

Go to Source