उद्या रिलीज होणार हे दोन खास मराठी चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिलिंद इनामदार दिग्दर्शित ‘सोंग्या’ हा चित्रपट १५ डिसेंबरपासून चित्रपटगृहात दाखल होत आहे.  (Marathi Movies ) दीपक यादव यांनी लिहिलेली ही संवेदनशील कथा शुभ्रा आणि यशराज या दोन प्रेमी युगुलांवर आधारित आहे. या दोघांच्या अनुषंगाने खुलत जाणारी ही प्रेमकथा जुनाट रूढी-परंपरांच्या विळख्यात अडकते. समाजाला शरण न जाणारी शुभ्रा आपल्यावरील अन्याय सहन तर … The post उद्या रिलीज होणार हे दोन खास मराठी चित्रपट appeared first on पुढारी.

उद्या रिलीज होणार हे दोन खास मराठी चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिलिंद इनामदार दिग्दर्शित ‘सोंग्या’ हा चित्रपट १५ डिसेंबरपासून चित्रपटगृहात दाखल होत आहे.  (Marathi Movies ) दीपक यादव यांनी लिहिलेली ही संवेदनशील कथा शुभ्रा आणि यशराज या दोन प्रेमी युगुलांवर आधारित आहे. या दोघांच्या अनुषंगाने खुलत जाणारी ही प्रेमकथा जुनाट रूढी-परंपरांच्या विळख्यात अडकते. समाजाला शरण न जाणारी शुभ्रा आपल्यावरील अन्याय सहन तर करत नाहीच पण ती अशा रूढींविरोधात आवाज उठवते. (Marathi Movies )
संबंधित बातम्या –

Manisha Rani : आधी मुंबईत घर आता मर्सिडीज; मनीषा राणीचं स्वप्न साकार
Koffee With Karan 8 : मलायकाशी लग्नाबद्दल अर्जुन कपूरने दिली मोठी हिंट
आदित्य रॉय Aashiqui 3 मधून बाहेर, कार्तिक आर्यनला भूमिका मिळताच…

आपल्या पारंपरिक भारुडांच्या माध्यमातून जनजागृती करणारी प्रातिनिधिक स्वरूपातील शुभ्रा हे पात्र असंख्य मुलींचे बळी जाण्यापासून वाचवू शकते अशी निर्माते-दिग्दर्शक मिलिंद इनामदार यांना आशा आहे. चित्रपटाच्या अनुषंगाने विविध गाण्यांची ‘सोंग्या’ मध्ये रेलचेल असून ‘दादा झाले अध्यक्ष, त्यांचं दिल्लीवर लक्ष’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय.

‘सोंग्या’ चित्रपटातील मुख्य भूमिकेत ऋतुजा बागवे, अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईफोडे आदि कलाकार दिसणार आहेत. निशांत काकिर्डे, राहुल पाटील, मिलिंद इनामदार ‘सोंग्या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले आहे. संगीत विजय गवंडे यांचे आहे. आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, योगेश चिकटगावकर, स्वप्नजा लेले, अमिता घूगरी यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. छायांकन अरविंद कुमार तर संकलन निलेश गावंड यांचे आहे.

‘छापा काटा’ देखील १५ डिसेंबरलाच प्रदर्शित
अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपट १५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातलं ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ गाणं रसिकांना प्रेमाच्या मोहक गंधात धुंद करत आहे. गाण्याचे बोल मेघना गोरे यांनी लिहिले असून सुप्रसिद्ध संगीतकार मुकेश काशीकर यांनी बेधुंद संगीत दिले आहे. सुनिधि चौहान यांच्या आवाजतलं ‘मन हे गुंतले’ हृदय पिळवटून टाकणारं गाणं शिवम बारपांडे यांनी शब्दबद्ध केले असून मराठी हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध संगीतकार गौरव चाटी यांनी संगीत दिले आहे.

लोकांना वेड्यात काढून पॉलिसी विकणारा करामती नाम्या बहिणीच्या लग्नासाठी श्रीमंत शनयाशी लग्नाचा करार करतो खरा, पण हा नकली लग्नाचा करार नाम्या आणि शनायाच्या कुटुंबात काय धमाल विनोदी गोंधळ घालणार आणि त्या कराराचं पुढे काय होणार हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. नाम्या म्हणजेच मकरंद अनासपूरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर चित्रपटात पहायला मिळणार आहेत.
चित्रपटाची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे. छायाचित्रण गौरव पोंक्षे, कार्यकारी निर्माता दर्शन चोथाणी आहे.
The post उद्या रिलीज होणार हे दोन खास मराठी चित्रपट appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिलिंद इनामदार दिग्दर्शित ‘सोंग्या’ हा चित्रपट १५ डिसेंबरपासून चित्रपटगृहात दाखल होत आहे.  (Marathi Movies ) दीपक यादव यांनी लिहिलेली ही संवेदनशील कथा शुभ्रा आणि यशराज या दोन प्रेमी युगुलांवर आधारित आहे. या दोघांच्या अनुषंगाने खुलत जाणारी ही प्रेमकथा जुनाट रूढी-परंपरांच्या विळख्यात अडकते. समाजाला शरण न जाणारी शुभ्रा आपल्यावरील अन्याय सहन तर …

The post उद्या रिलीज होणार हे दोन खास मराठी चित्रपट appeared first on पुढारी.

Go to Source