Nagar : पाथर्डीत मयत सैनिकाचा भूखंड लाटला

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  मयत सैनिक आजीनाथ शहादेव काळे यांच्या नावावरील भूखंड बनावट व्यक्ती उभी करून विक्री करणार्‍या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्रिदल सैनिक संघटनेने यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत दुय्यम निबंधक अनिल जव्हेरी यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन गर्जे, रोहिदास … The post Nagar : पाथर्डीत मयत सैनिकाचा भूखंड लाटला appeared first on पुढारी.

Nagar : पाथर्डीत मयत सैनिकाचा भूखंड लाटला

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  मयत सैनिक आजीनाथ शहादेव काळे यांच्या नावावरील भूखंड बनावट व्यक्ती उभी करून विक्री करणार्‍या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्रिदल सैनिक संघटनेने यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत दुय्यम निबंधक अनिल जव्हेरी यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन गर्जे, रोहिदास एडके, विठ्ठल तांदळे, रामराव चेमटे, म्हातारदेव आव्हाड, मधुकर चन्ने, अशोक देवढे, प्रभाकर फुंदे, सुधाकर आव्हाड, रमेश कराळे, किशोर शिरसाट, रामनाथ भाबड, चांद पठाण आदी माजी सैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.
दुय्यम निबंधक जव्हेरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मयत सैनिक आजीनाथ शहादेव काळे यांच्या जागी उभ्या केलेल्या बनावट व्यक्तीने मयत सैनिक काळे (रा. हाकेवाडी, पो.मोहजदेवढे, ता. पाथर्डी) यांचा भूखंड प्रदीप विष्णू गायकवाड (रा. ढाकणवाडी, पो. खरवंडी, ता.पाथर्डी) याने खरेदी केला. दोघांची ओळख पटवून देणारे साक्षीदार प्रवीण गौतम गायकवाड, (रा. शिरूर कासार, जि. बीड), सोमनाथ रमेश काळोखे, (रा. पाथर्डी) या चौघांनी फसवणूक केली. मयत सैनिक काळे यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड, ओळखपत्र तयार करून त्याचा वापर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी केला. काळे यांच्या वारसांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघा आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
पाथर्डी येथील आनंदनगर येथील हा भूखंड मयत सैनिक आजीनाथ काळे यांच्या नावावर होता. काळे मयत झाल्याने आरोपींनी 5 जून 2023 रोजी त्याची खरेदी केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर करीत आहेत. दरम्यान, भूखंड फसवणूक प्रकरणी माजी सैनिक त्रिदल संघ संघटनेच्या वतीने तहसीलदार श्याम वाडकर यांना निवेदन देण्यात आले.
हेही वाचा :

Suspended MPs: संसद घुसखोरी प्रकरणावरून गदारोळ; संसद सभागृहांतील १५ खासदारांचे निलंबन
Jalgaon Crime : पती बाहेरगावी- पत्नी माहेरी, इकडे चोरट्यांनी साधला डाव; ३ लाखांची घऱफोडी

The post Nagar : पाथर्डीत मयत सैनिकाचा भूखंड लाटला appeared first on पुढारी.

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  मयत सैनिक आजीनाथ शहादेव काळे यांच्या नावावरील भूखंड बनावट व्यक्ती उभी करून विक्री करणार्‍या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्रिदल सैनिक संघटनेने यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत दुय्यम निबंधक अनिल जव्हेरी यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन गर्जे, रोहिदास …

The post Nagar : पाथर्डीत मयत सैनिकाचा भूखंड लाटला appeared first on पुढारी.

Go to Source