सेन्सेक्स-निफ्टीची उच्चांकी झेप, जाणून घ्या आज बाजारात काय घडलं?
पुढारी ऑनलाईन डेस्क : Stock Market Closing Bell : भारतीय शेअर बाजारात आज (दि.14) व्यवहाराची सुरुवात होताच गुंतवणुकदारांनी तेजीचा झंझावत अनुभवला. प्रमुख निर्देशांक सार्वकालीन उच्चांकावर उघडले आणि नवीन विक्रम प्रस्थापित केले. दिवसभराच्या व्यवहारात ही तेजी कायम राहिली आणि दिवसाअखेर बाजार बंद झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्स 70,528.73 वर तर निफ्टी 21,198.10 वर स्थिरावला. बुधवारी (दि. 13 डिसेंबर) सेन्सेक्स 33 अंकांनी वाढून 69,584 वर बंद झाला होता.
आज बाजारात बँकिंग आणि आयटी क्षेत्रात सर्वाधिक खरेदी नोंदवली गेली. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टीने रेकॉर्डब्रेक पातळीवर गाठली. बँक निफ्टीनेही 48000 चा स्तर गाठला. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप प्रथमच 354 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. बाजार मुल्याच्या दृष्टीने भारतीय शेअर बाजार जगातील 7 वा सर्वात मोठा बाजार बनला आहे.
बाजारात चौफेर खरेदी (Stock Market Closing Bell)
गुरुवारी बाजारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांच्या नेतृत्वाखालील वाढीसह व्यापक निर्देशांक सकारात्मक क्षेत्रात उघडले. बाजारातील चौफेर खरेदीत बँकिंग आणि आयटी समभाग आघाडीवर आहेत. HCL Technologies, Tech Mahindra, LTI Mindtree, Infosys आणि Wipro हे निफ्टी 50 निर्देशांकात सर्वाधिक वाढले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 1.38% ने वाढून रु. 2,467.20 वर पोहोचली आहे. मूडीजने रिलायन्सचे रेटिंग Baa2 वर स्थिर दृष्टीकोनसह पुष्टी केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. सलग पाचव्या फाईव्ह टर्म कालावधीसाठी ती आपल्या गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठी संपत्ती निर्माता म्हणून उदयास आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने 2018 ते 2023 (31 मार्च 2023 पर्यंत) या कालावधीत 9.63 लाख कोटी रुपयांची भर घातली आहे.
HDFC लाईफ आणि मॅक्स फायनान्शिअलच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. HDFC लाईफमध्ये दोन तर मॅक्स फायनान्शियलचे शेअर्स 2.65 टक्क्यांनी घसरले. वास्तविक, IRDAI ने नॉन PAR उत्पादनांवर उच्च सरेंडर मूल्य प्रस्तावित केले आहे. तेव्हापासून शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली.
Stock Market Closing Bell : निफ्टीने प्रथमच पार केला 21,150 चा टप्पा
बाजारात तेजीचा कल कायम आजही कायम राहिला आहे. आयटी निर्देशांक 8 महिन्यांच्या उच्चांकावर व्यवहार करत आहे. 5 महिन्यांत आयटी निर्देशांकात इंट्रा-डे मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, निफ्टीने प्रथमच 21,150 चा टप्पा ओलांडला आहे. सेन्सेक्सने प्रथमच 70,400 चा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टी बँक प्रथमच 47,800 च्या पुढे व्यवहार करत आहे.
अमेरिकेसह आशियाई बाजारातूनही सकारात्मक संकेत
अमेरिकेतून बाजारासाठी चांगली बातमी येत आहे. FED ने व्याजदरात कोणताही बदल केला नाही. 2024 मध्ये तीन वेळा दर कमी करण्याचे संकेत आहेत. पुढील वर्षी दर दीड टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात. 10 वर्षांचे रोखे उत्पन्न 4 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. दरम्यान, फेडच्या या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला. अमेरिकेच्या शेअर बाजारानेही तेजी अनुभवली. तसेच द. आशियाई बाजारांमध्ये व्यापार तेजीत राहिला. GIFT NIFTY 200.00 अंकांनी वधारला आहे. तैवानचा बाजार 0.99 टक्क्यांनी वाढून 17,642.62 वर व्यवहार करत आहे. तर हँग सेंग 0.80 टक्क्यांनी वाढून 16,363.64 च्या पातळीवर दिसला.
The post सेन्सेक्स-निफ्टीची उच्चांकी झेप, जाणून घ्या आज बाजारात काय घडलं? appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : Stock Market Closing Bell : भारतीय शेअर बाजारात आज (दि.14) व्यवहाराची सुरुवात होताच गुंतवणुकदारांनी तेजीचा झंझावत अनुभवला. प्रमुख निर्देशांक सार्वकालीन उच्चांकावर उघडले आणि नवीन विक्रम प्रस्थापित केले. दिवसभराच्या व्यवहारात ही तेजी कायम राहिली आणि दिवसाअखेर बाजार बंद झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्स 70,528.73 वर तर निफ्टी 21,198.10 वर स्थिरावला. बुधवारी (दि. 13 …
The post सेन्सेक्स-निफ्टीची उच्चांकी झेप, जाणून घ्या आज बाजारात काय घडलं? appeared first on पुढारी.