ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिकेमध्ये अंतिम फेरीसाठी चुरस; आज दुसरा सेमीफायनल

ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिकेमध्ये अंतिम फेरीसाठी चुरस; आज दुसरा सेमीफायनल

कोलकाता: वृत्तसंस्था : आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ईडन गार्डन्स स्टेडियमवर गुरुवारी (१६ नोव्हेंबर) माजी विजेता ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल. गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये अंतिम फेरी गाठण्यासाठी मोठी चुरस आहे. (South Africa vs Australia)
संबंधित बातम्या : 

जीगरबाज मोहम्मद शमी! ‘सात’ विकेट घेऊन न्यूझीलंडचा उडवला धुव्वा
भारताची फायनलमध्ये धडक! उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव
श्रेयस अय्यरने सलग दोन शतके झळकावून रचले ‘हे’ विक्रम

यंदाच्या स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेतल्यास दोन्ही संघांनी ९ पैकी प्रत्येकी ७ सामने खेळताना १४ गुण मिळवले. मात्र, सरस रनरेटच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसरे स्थान मिळवले. मात्र, स्पर्धेतील ७ विजयापैकी सलग ७ विजयांसह ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम फॉर्म राखला आहे. दक्षिण आफ्रिकेला सलग चार सामने जिंकता आलेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जवळपास समसमान कामगिरी असली तरी उभय संघातील मागील पाच एकदिवसीय सामन्यांचा विचार करता मागील चारही सामने जिंकून आफ्रिकन संघाने ऑस्ट्रेलियन्सवर ४-१ अशी मोठी आघाडी घेतली आहे. २०२३ विश्वचषक स्पर्धेत लखनौमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले. त्यात दक्षिण आफ्रिका सरस ठरला. टेम्बा बवुमा आणि सहकार्यांसाठी ही जमेची बाजू ठरू शकते. (South Africa vs Australia)
वैयक्तिक कामगिरीचा लेखाजोगा मांडायचा ठरवल्यास यष्टिक्षक, फलंदाज क्विटन डी कॉकने ४ शतके ठोकताना दक्षिण आफ्रिकेची बॅटिंगची धुरा सांभाळली आहे. व्हॅन डर ड्यूसेन (२ शतके तितकीच अर्धशतके), आवडन मर्करम (१ शतक, तीन अर्धशतके) आणि हेन्रिक्स क्लासेनने (१ अर्धशतक) फलंदाजी उंचावण्यात मोलाचे योगदान दिले आहे. ५ फलंदाजांची ४० हून अधिक सरासरी ही आफ्रिकन संघाची मजबूत फलंदाजीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. मात्र, डेव्हिड मिलर आणि कर्णधार बवुमा याला अपेक्षित बॅटिंग करता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही समाधानकारक कामगिरी केली आहे. गेराल्ड कोएल्झीने ७ सामन्यांत १८ विकेट घेत सातत्य राखले आहे. त्याच्यासह डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सेन (१७ विकेट), डावखुरा स्पिनर केशव महाराज (१४ विकेट) तसेच अनुभवी कॅगिसो रबाडा (१२ विकेट) आणि लुन्गी एन्गिडी (१० विकेट) यांनी गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे. मिचेल मार्श (२ शतके, १ अर्धशतक) आणि डेव्हिड वॉर्नरचे सातत्य (२ शतके आणि तितकीच अर्धशतके) तसेच ग्लेन मॅक्सवेलला (२ शतके) उशीरा गवसलेला सूर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी उंचावण्यासाठी पुरेसा ठरला आहे.
माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि मॅर्नस लॅबुशेन यांनी प्रत्येकी २ अर्धशतके झळकावली तरी त्यांना अपेक्षित फलंदाजी करता आलेली नाही. माजी विजेत्यांची गोलंदाजीही प्रभावी ठरत आहे. त्यात लेगस्पिनर अॅडम झम्पाने ९ सामन्यांत सर्वाधिक २२ विकेट घेत प्रतिस्पर्धी फलंदाजांना जेरीस आणले आहे. मात्र, त्यांचा वेगवान मारा थोडा बोथट वाटत आहे. जोश हॅइलेवुडसह (१२ विकेट) पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांची (प्रत्येकी १० विकेट) बॉलिंग तितकी प्रभावी नाही. ऑस्ट्रेलियासाठी ही कमकुवत बाब ठरू शकते.
हेही वाचा : 

बाबरचा राजीनामा, पाक संघाच्या तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले
कोहलीच्या वनडे शतकांचे ‘विराट अर्धशतक’! सचिन तेंडुलकरला टाकले मागे

The post ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिकेमध्ये अंतिम फेरीसाठी चुरस; आज दुसरा सेमीफायनल appeared first on पुढारी.

कोलकाता: वृत्तसंस्था : आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ईडन गार्डन्स स्टेडियमवर गुरुवारी (१६ नोव्हेंबर) माजी विजेता ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल. गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये अंतिम फेरी गाठण्यासाठी मोठी चुरस आहे. (South Africa vs Australia) संबंधित बातम्या :  जीगरबाज मोहम्मद शमी! ‘सात’ विकेट घेऊन न्यूझीलंडचा उडवला धुव्वा भारताची …

The post ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिकेमध्ये अंतिम फेरीसाठी चुरस; आज दुसरा सेमीफायनल appeared first on पुढारी.

Go to Source