ब्रेकिंग: संसद सुरक्षा गदारोळावरून काँग्रेसचे ५ खासदार निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्क: संसद सुरक्षा भंग प्रकरणावरून संसदेत गदारोळ घातल्याने काँग्रेसच्या पाच लोकसभा खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा खासदारांच्या शिस्तभंग वर्तनामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. Congess MPs suspended : पाच खासदार निलंबित बुधवारी (दि.१३) संसद सुरक्षा भंग झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच … The post ब्रेकिंग: संसद सुरक्षा गदारोळावरून काँग्रेसचे ५ खासदार निलंबित appeared first on पुढारी.
#image_title

ब्रेकिंग: संसद सुरक्षा गदारोळावरून काँग्रेसचे ५ खासदार निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्क: संसद सुरक्षा भंग प्रकरणावरून संसदेत गदारोळ घातल्याने काँग्रेसच्या पाच लोकसभा खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा खासदारांच्या शिस्तभंग वर्तनामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
Congess MPs suspended : पाच खासदार निलंबित
बुधवारी (दि.१३) संसद सुरक्षा भंग झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच गदारोळ सुरू झाला. विरोधी पक्षाच्या काँग्रस खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत, सभागृहात गदारोळ घातला. दरम्यान “अनियमित वर्तन” केल्याबद्दल काँग्रेसच्या पाच खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेच्या निलंबित खासदारांमध्ये डीन कुरियाकोसे, हिबी इडन, जोथिमनी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांचा समावेश आहे. यापूर्वी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले होते. या कारवाईमुळे विरोधी पक्षातील सदस्यांविरुद्ध करण्यात आलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या यादीत भर पडली आहे, असे इंडिया टुडेने म्हटले आहे.

#WATCH | Five Congress Lok Sabha MPs- TN Prathapan, Hibi Eden, S Jothimani, Ramya Haridas and Dean Kuriakose- suspended from Lok Sabha for the rest of the session for “unruly conduct” pic.twitter.com/jsk5DNR0jR
— ANI (@ANI) December 14, 2023

हेही वाचा 

Koose Munisamy Veerappan series : मगरी तुमचं शोषण करायच्या प्रतीक्षेत; वीरप्पनने रजनीकांतना दिला होता इशारा
Nashik Shinde Gat : ‘क्लब टेंडर’वरून शिंदे गटात नाराजीचे फटाके, प्रत्येक कामाची स्वतंत्र निविदा काढण्याची मागणी
Parliament Winter Session: संसद ‘घुसखोरी’ प्रकरणी लोकसभेत गदारोळ; कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब
शेअर बाजारात तेजीचा ‘झंझावात’! सेन्सेक्स सार्वकालीन उच्चांकावर, निफ्टीने प्रथमच ओलांडला 21,100 चा टप्पा

The post ब्रेकिंग: संसद सुरक्षा गदारोळावरून काँग्रेसचे ५ खासदार निलंबित appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: संसद सुरक्षा भंग प्रकरणावरून संसदेत गदारोळ घातल्याने काँग्रेसच्या पाच लोकसभा खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा खासदारांच्या शिस्तभंग वर्तनामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. Congess MPs suspended : पाच खासदार निलंबित बुधवारी (दि.१३) संसद सुरक्षा भंग झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच …

The post ब्रेकिंग: संसद सुरक्षा गदारोळावरून काँग्रेसचे ५ खासदार निलंबित appeared first on पुढारी.

Go to Source