नाशिक शहरातील रस्त्यांच्या ‘व्हाईट टॉपिंग’साठी सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दरवर्षी डांबरीकरणावर शेकडो कोटींचा खर्च करूनही पावसाळ्यात रस्ते खड्डेमय होत असल्याने महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांसह गत सिंहस्थात केलेल्या रिंगरोडवर हैद्राबादच्या धर्तीवर ‘व्हॉईट टॉपिंग’ अर्थात रस्त्यांवर काँक्रीटीकरणाचा थर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेक्सन टेक्नो कन्सल्टन्सी या पुणे स्थित सल्लागार संस्थेच्या प्रतिनिधींनी बुधवारी (दि. १३) शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्यासमवेत प्राथमिक चर्चा … The post नाशिक शहरातील रस्त्यांच्या ‘व्हाईट टॉपिंग’साठी सर्वेक्षण appeared first on पुढारी.
#image_title
नाशिक शहरातील रस्त्यांच्या ‘व्हाईट टॉपिंग’साठी सर्वेक्षण


नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दरवर्षी डांबरीकरणावर शेकडो कोटींचा खर्च करूनही पावसाळ्यात रस्ते खड्डेमय होत असल्याने महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांसह गत सिंहस्थात केलेल्या रिंगरोडवर हैद्राबादच्या धर्तीवर ‘व्हॉईट टॉपिंग’ अर्थात रस्त्यांवर काँक्रीटीकरणाचा थर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेक्सन टेक्नो कन्सल्टन्सी या पुणे स्थित सल्लागार संस्थेच्या प्रतिनिधींनी बुधवारी (दि. १३) शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्यासमवेत प्राथमिक चर्चा केली असून व्हाईट टॉपिंगसाठी प्रस्तावित रस्त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणाअंती ‘व्हाईट टॉपिंग’साठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज लागू शकणार आहे.
गेल्या पाच वर्षांत महापालिकेने शहरातील रस्ते डांबरीकरणावर तब्बल साडे बाराशे कोटी रुपये खर्च केले आहेत. दरवर्षी सरासरी अडीचशे कोटी रुपये रस्ते डांबरीकरणावर खर्च केले जातात. मात्र दरवर्षी पावसाळ्यात हे रस्ते खड्डेमय बनतात. त्यामुळे या रस्त्यांच्या दुरूस्तीवर पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. यातून ठेकेदारांचेच चांगभले होते. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून कर रूपाने जमा होणाऱ्या पैशांची मात्र उधळपट्टी होते. डांबरी रस्त्यांच्या तुलनेत काँक्रिटचे रस्ते अधिक काळ टिकतात. ऊन-पावसाचा काँक्रिटच्या रस्त्यावर कुठलाही परिणाम होत नाही. यंदाच्या पावसाळ्यातही शहरातील डांबरी रस्त्यांची दैना झाल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेतील आढावा बैठकीत शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांविषयी नाराजी व्यक्त करताना प्रशासनाची कानउघाडणी केली होती. त्यानंतर आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी भविष्यात शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला प्राधान्य दिले जाईल, असे जाहीर केले होते. मात्र रस्ते काँक्रिटीकरणावर होणारा खर्च हा डांबरीकरणाच्या खर्चापेक्षा दुपटीहून अधिक असल्याने काँक्रिटीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचनाही करंजकर यांनी दिल्या होत्या. आता, रस्त्यांचे संपूर्ण काँक्रिटीकरण करण्याएेवजी प्रमुख मार्गांवरील तसेच गत सिंहस्थात तयार केलेल्या ७७ किलोमीटर लांबीच्या रिंगरोडवर हैद्राबादच्या धर्तीवर व्हाईट टॅपिंगचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून सुमारे १२० किमीच्या रस्त्यांवर पहिल्या टप्प्यात व्हाईट टॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पुण्यातील नेक्सन टेक्नो कन्सल्टन्सी या सल्लागार कंपनीने महापालिकेकडे प्राथमिक प्रस्ताव सादर केला असून कंपनीच्या प्रतिनिधींनी बुधवारी शहर अभियंता वंजारी यांच्याशी चर्चा केली आहे. सिंहस्थातील बाह्य पार्कींगच्या प्रश्नावरही या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली.
काय आहे व्हाईट टाॅपिंग?
खड्ड्यांनी चाळण झालेल्या डांबरी रस्त्यांचे ग्रीलिंग अर्थात हलके खोदकाम करून त्यावर काँक्रिटचा थर देऊन संपूर्ण रस्ता तयार केला जातो. या तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या रस्त्यांची उंची वाढत नाही. परिणामी रस्त्यांलगतच्या सखल भागात पाणी साचण्याची समस्या राहत नाही. डांबरीकरणाच्या तुलनेत हे रस्ते टिकाऊ असतात. डांबरीकरणासाठी लागणारी वाळू, खडी यात लागत नाही. त्याचीही बचत होते. व्हाईट टॉपिंग पध्दतीचे काँक्रिटचे रस्ते तापमान कमी राखण्यास मदत करतात.
हेही वाचा :

PM Modi On Parliament Security Breach: ‘संसद घुसखोरी’ प्रकरणी PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक
Paid Menstrual Leave : मासिक पाळी म्‍हणजे अपंगत्व नाही : स्मृती इराणींचा पगारी रजेला विरोध
Pune : लोणी भापकरला दुष्काळी स्थितीची पाहणी

The post नाशिक शहरातील रस्त्यांच्या ‘व्हाईट टॉपिंग’साठी सर्वेक्षण appeared first on पुढारी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दरवर्षी डांबरीकरणावर शेकडो कोटींचा खर्च करूनही पावसाळ्यात रस्ते खड्डेमय होत असल्याने महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांसह गत सिंहस्थात केलेल्या रिंगरोडवर हैद्राबादच्या धर्तीवर ‘व्हॉईट टॉपिंग’ अर्थात रस्त्यांवर काँक्रीटीकरणाचा थर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेक्सन टेक्नो कन्सल्टन्सी या पुणे स्थित सल्लागार संस्थेच्या प्रतिनिधींनी बुधवारी (दि. १३) शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्यासमवेत प्राथमिक चर्चा …

The post नाशिक शहरातील रस्त्यांच्या ‘व्हाईट टॉपिंग’साठी सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Go to Source