ब्रेकिंग न्यूज : लोकसभा सचिवालयाकडून आठ कर्मचारी निलंबित
पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवार, १३ डिसेंबर रोजी तरुणांनी लोकसभेत घुसखोरी केली. संसदेवर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा 22 वा स्मृती दिन बुधवारी होता. याच दिवशी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्या. लोकसभेमध्ये दुपारी एकच्या सुमारास शून्यकाळ सुरू असताना घुसखोरीचा प्रकार घडला. (Parliament Attack) दरम्यान, सुरक्षा व्यवस्थेतील अक्षम्य चुकीची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. लोकसभा सचिवालयाने आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
आराेपींवर UAPA कलमांतर्गत गुन्हा दाखल
लोकसभेचं कामकाज सुरू असताना तरुणांनी बुधवारी (दि. 13) घुसखोरी करुन घोषणा देत धुराचे नळकांडे फोडले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यातील(UAPA ) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ( Parliament Security Breach )
Parliament Security Breach : लाेकसभेत नेमंक काय घडलं !
संसद अधिवेशनादरम्यान तरुणांनी बुधवारी (दि.13) लोकसभेत घुसखोरी करून ‘तानाशाही नहीं चलेगी, लोकतंत्र बचाओ, काला कानून खतम करो,’ अशा घोषणा देत धुराचे नळकांडे फोडले. संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला बुधवारी 22 वर्षे पूर्ण होत असताना, नव्या संसद भवनाच्या सुरक्षेला खिंडार पाडणार्या या घटनाक्रमामुळे सरकारसह सुरक्षा यंत्रणांची एकच तारांबळ उडाली. यामुळे संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेचे दावे फोल ठरले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एक तरुण आणि हरियाणातील एका तरुणीसह पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील एकजण फरारी आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली होती.
आतापर्यंत 4 जणांना अटक, विविध गुन्हे दाखल
संसदेच्या सुरक्षेचा भंग कलम 120-बी (गुन्हेगारी कट), 452 (अतिक्रमण), कलम 153 (फक्त दंगल घडवण्याच्या हेतूने चिथावणी देणे), 186 (सार्वजनिक कार्यात सार्वजनिक सेवकांना अडथळा आणणे), 353 (हल्ला किंवा फौजदारी बळजबरी) अंतर्गत गुन्हा ) सार्वजनिक सेवकांना त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी) आयपीसी आणि UAPA च्या 16 आणि 18 कलमांची पार्लमेंट स्ट्रीट पीएस येथे नोंदणी करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण विशेष कक्षाकडे वर्ग करण्यात येत आहे. आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील विकी आणि त्याच्या पत्नीची चौकशी सुरू आहे.
Lok Sabha Secretariat has suspended total eight security personnel in yesterday’s security breach incident.
— ANI (@ANI) December 14, 2023
हेही वाचा
शेअर बाजारात तेजीचा ‘झंझावात’! सेन्सेक्स सर्वकालीन उच्चांकावर, निफ्टीने प्रथमच ओलांडला 21,100 चा टप्पा
The post ब्रेकिंग न्यूज : लोकसभा सचिवालयाकडून आठ कर्मचारी निलंबित appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवार, १३ डिसेंबर रोजी तरुणांनी लोकसभेत घुसखोरी केली. संसदेवर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा 22 वा स्मृती दिन बुधवारी होता. याच दिवशी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्या. लोकसभेमध्ये दुपारी एकच्या सुमारास शून्यकाळ सुरू असताना घुसखोरीचा प्रकार घडला. (Parliament Attack) दरम्यान, सुरक्षा व्यवस्थेतील अक्षम्य चुकीची गंभीर दखल केंद्र …
The post ब्रेकिंग न्यूज : लोकसभा सचिवालयाकडून आठ कर्मचारी निलंबित appeared first on पुढारी.