पुढारी ऑनलाईन डेस्क: संसदेचे सुरक्षाकडे भेदून संसदेत घुसरखोरी केल्यानंतर संसदेतील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान आज (दि.१४) संसदेतील ‘मकरद्वार’ मधून केवळ खासदारांनाच प्रवेश देण्यात येत आहे. केवळ खासदारांनाच संसदेत प्रवेश दिला जात आहे. तर माध्यमांना काही मीटर अंतरावर ठेवण्यात आले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
#WATCH | Following the Dec 13 security breach, only MPs are being allowed to enter Parliament from Makar Dwar, media now positioned a few metres away from there pic.twitter.com/ZmgKyZv9vE
— ANI (@ANI) December 14, 2023
लोकसभा सचिवालयाकडून सात कर्मचारी निलंबित
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवार, १३ डिसेंबर रोजी तरुणांनी लोकसभेत घुसखोरी केली. संसदेवर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा 22 वा स्मृती दिन बुधवारी होता. याच दिवशी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्या. लोकसभेमध्ये दुपारी एकच्या सुमारास शून्यकाळ सुरू असताना घुसखोरीचा प्रकार घडला. (Parliament Attack) दरम्यान, सुरक्षा व्यवस्थेतील अक्षम्य चुकीची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. लोकसभा सचिवालयाने सात कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
संसदेत घुसखोरी; आरोपींवर UAPA अंतर्गत विविध गुन्हे दाखल
लोकसभेचं कामकाज सुरू असताना काही तरुणांनी बुधवारी (दि. 13) घुसखोरी करुन घोषणा देत धुराचे नळकांडे फोडले. या तरुणांवर संसदेचे सुरक्षा कडे भेदून संसदेत घुसरखोरी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यातील (UAPA ) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ( Parliament Security Breach ) संसदेच्या सुरक्षेचा भंग, अतिक्रमण, सार्वजनिक कार्यात सार्वजनिक सेवकांना अडथळा आणणे असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ती.
केंद्रीय गृह मंत्रालयानेही दिले चौकशीचे आदेश
केंद्रीय गृह मंत्रालयानेही संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून हे आदेश देण्यात आले आहेत. अनिश दयाळ सिंग, DG, CRPF यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये इतर सुरक्षा संस्था आणि तज्ञ सदस्य आहेत,” गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा:
Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी : आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
Parliament Attack : ‘या’ दहा देशांच्या संसदेवरही झाले होते हल्ले
Parliament Attack : सुरक्षा कडे भेदून संसदेत दोन तरुणांची घुसखोरी
The post संसदेच्या सुरक्षेत वाढ; ‘मकरद्वार’ मधून केवळ खासदारांनाच प्रवेश appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क: संसदेचे सुरक्षाकडे भेदून संसदेत घुसरखोरी केल्यानंतर संसदेतील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान आज (दि.१४) संसदेतील ‘मकरद्वार’ मधून केवळ खासदारांनाच प्रवेश देण्यात येत आहे. केवळ खासदारांनाच संसदेत प्रवेश दिला जात आहे. तर माध्यमांना काही मीटर अंतरावर ठेवण्यात आले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. #WATCH | Following the Dec 13 security breach, …
The post संसदेच्या सुरक्षेत वाढ; ‘मकरद्वार’ मधून केवळ खासदारांनाच प्रवेश appeared first on पुढारी.