ऊर्जेचा स्रोत म्हणून होऊ शकतो कृष्णविवरांचा वापर

बिजिंग : अंतराळातील सर्वात शक्तिशाली घटकांमध्ये कृष्णविवरांचा समावेश होतो. कृष्णविवरांच्या आकर्षण शक्तीतून प्रकाशकिरणही सुटू शकत नाही. अशा कृष्णविवरांचा वापर ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून मानवाकडून होऊ शकतो, असे संशोधकांना वाटते. एखाद्या भव्य बॅटरीसारखा कृष्णविवरांचा वापर होऊ शकतो असे संशोधकांनी म्हटले आहे. एका नव्या संशोधनात कृष्णविवरांचा वापर ऊर्जेचा स्रोत म्हणून दोन प्रकारे होऊ शकतो असे संशोधकांनी म्हटले … The post ऊर्जेचा स्रोत म्हणून होऊ शकतो कृष्णविवरांचा वापर appeared first on पुढारी.
#image_title

ऊर्जेचा स्रोत म्हणून होऊ शकतो कृष्णविवरांचा वापर

बिजिंग : अंतराळातील सर्वात शक्तिशाली घटकांमध्ये कृष्णविवरांचा समावेश होतो. कृष्णविवरांच्या आकर्षण शक्तीतून प्रकाशकिरणही सुटू शकत नाही. अशा कृष्णविवरांचा वापर ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून मानवाकडून होऊ शकतो, असे संशोधकांना वाटते. एखाद्या भव्य बॅटरीसारखा कृष्णविवरांचा वापर होऊ शकतो असे संशोधकांनी म्हटले आहे.
एका नव्या संशोधनात कृष्णविवरांचा वापर ऊर्जेचा स्रोत म्हणून दोन प्रकारे होऊ शकतो असे संशोधकांनी म्हटले आहे. कृष्णविवरांची स्वतःभोवती फिरण्याचा आणि गुरुत्वाकर्षणाचा गुणधर्म वापरून त्यांच्यामधून ऊर्जा मिळवता येऊ शकते, असे संशोधकांना वाटते.
पेकिंग युनिव्हर्सिटीतील कॅवली इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रॉफिजिक्समधील विद्यार्थी संशोधक झान फेंग मई यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की कृष्णविवरांमधून ऊर्जा बाहेर काढता येऊ शकते याची आम्हाला माहिती आहे. तसेच कृष्णविवरांमध्ये ऊर्जा पेरलीही जाऊ शकते. त्यामुळे कृष्णविवरांचा वापर बॅटरीसारखाच होऊ शकतो. ‘फिजिकल रिव्ह्यू डी’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
The post ऊर्जेचा स्रोत म्हणून होऊ शकतो कृष्णविवरांचा वापर appeared first on पुढारी.

बिजिंग : अंतराळातील सर्वात शक्तिशाली घटकांमध्ये कृष्णविवरांचा समावेश होतो. कृष्णविवरांच्या आकर्षण शक्तीतून प्रकाशकिरणही सुटू शकत नाही. अशा कृष्णविवरांचा वापर ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून मानवाकडून होऊ शकतो, असे संशोधकांना वाटते. एखाद्या भव्य बॅटरीसारखा कृष्णविवरांचा वापर होऊ शकतो असे संशोधकांनी म्हटले आहे. एका नव्या संशोधनात कृष्णविवरांचा वापर ऊर्जेचा स्रोत म्हणून दोन प्रकारे होऊ शकतो असे संशोधकांनी म्हटले …

The post ऊर्जेचा स्रोत म्हणून होऊ शकतो कृष्णविवरांचा वापर appeared first on पुढारी.

Go to Source