धक्कादायक : आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाने वेश्या व्यवसाय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सहकारनगर परिसरातील बालाजीनगर येथे आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. या वेळी पाच पीडित महिलांची तेथून सुटका करण्यात आली. या प्रकरणी मसाज सेंटरचा मालक उमेश मल्लपा तराळ (रा. बालाजीनगर) याला अटक केली आहे. याबाबत पोलिस हवालदार अजय राणे यांनी दिलेल्या … The post धक्कादायक : आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाने वेश्या व्यवसाय appeared first on पुढारी.
#image_title

धक्कादायक : आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाने वेश्या व्यवसाय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सहकारनगर परिसरातील बालाजीनगर येथे आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. या वेळी पाच पीडित महिलांची तेथून सुटका करण्यात आली. या प्रकरणी मसाज सेंटरचा मालक उमेश मल्लपा तराळ (रा. बालाजीनगर) याला अटक केली आहे. याबाबत पोलिस हवालदार अजय राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तराळ याच्याविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील यांच्या पथकाने सृष्टी आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्रावर छापा टाकला असता, पाच पीडित महिला तेथे मिळून आल्या. आरोपी तराळ हा त्यांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत होता. सुटका करण्यात आलेलया पाच महिलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप देशमाने करीत आहेत.
हेही वाचा

अखिल भारतीय पोलिस पाईप बँड स्पर्धा; महाराष्ट्र पोलिस दुसर्‍यांदा अव्वल
एसटीची 30 रूपयांत नाश्ता योजना नावालाच
Pune News : ‘पीएम आवास’मध्ये आढळले पाच भाडेकरू

The post धक्कादायक : आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाने वेश्या व्यवसाय appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सहकारनगर परिसरातील बालाजीनगर येथे आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. या वेळी पाच पीडित महिलांची तेथून सुटका करण्यात आली. या प्रकरणी मसाज सेंटरचा मालक उमेश मल्लपा तराळ (रा. बालाजीनगर) याला अटक केली आहे. याबाबत पोलिस हवालदार अजय राणे यांनी दिलेल्या …

The post धक्कादायक : आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाने वेश्या व्यवसाय appeared first on पुढारी.

Go to Source