नवी दिल्ली : हिवाळा आला की बाजारात लालचुटूक गाजरंही दिसू लागतात. गाजरांचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक असते. मात्र, केवळ लालच गाजरं असतात असे नाही. काळीही गाजरे असतात व ती लाल गाजरापेक्षाही अधिक गुणकारी असतात हे तुम्हाला माहिती आहे का?
‘सायन्स डायरेक्ट’वर प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की काळ्या गाजरांमध्ये लाल आणि केशरी गाजरांपेक्षा जास्त फ्लेव्होनॉइडस् असतात. यापैकी क्वेरसेटीन, ल्यूटोलिन, केम्पफेरॉल आणि मायरिसेटिन प्रमुख आहेत, जे शरीराला अनेक फायदे देतात. फ्लेव्होनॉइडस्मध्ये अँटिऑक्सिडंटस्, अँटी-इन्फ्लेमेटरी, इम्युनो बूस्टर गुणधर्म असतात. हे गुणधर्म मुक्त रॅडिकल्स, जळजळ आणि कमकुवत रोगप्रतिकारक प्रणालीपासून संरक्षण करतात. अशा ‘फ्री रॅडिकल्स’मुळे 100 पेक्षा जास्त रोग होऊ शकतात.
‘एनसीबीआय’च्या संशोधनात काळ्या गाजराचे ‘मधुमेहविरोधी अन्न’ म्हणून वर्णन केले आहे. यात फिनोलिक संयुगे असतात, ज्यामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्याची शक्ती असते. त्याचे सेवन मधुमेहाच्या घातक परिणामांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकते. केमोथेरपीमुळे कर्करोगाचे उपचार सोपे झाले आहेत, परंतु ते खूप वेदनादायक ठरू शकतात. त्यामुळे जगभरात कर्करोगाच्या उपचार आणि प्रतिबंधात हर्बल आणि आयुर्वेदिक उपायांचाही विचार केला जात आहे.
फळे आणि भाज्यांप्रमाणे, काळ्या गाजरामध्ये देखील कर्करोगापासून संरक्षण करणारे फायटोकेमिकल्स असतात. यामध्ये असलेले पॉलिफेनॉल आणि आहारातील फायबर हानिकारक पदार्थांना रोखतात. तसेच पचन आणि चयापचय वाढवतात. अशा पदार्थांचा आहारात समावेश केल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि वजन कमी होते.
काळ्या गाजरामध्ये फायबर आणि बायोअॅक्टिव्ह कंपाऊंड असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि साखरेचं प्रमाण कमी करण्यास मदत करते. काळ्या गाजरांमध्ये भरपूर कॅरोटिनोइडस् असतात, जे डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात. मानसिक आरोग्याच्या समस्या, संधिवात, उच्च रक्तदाब आणि अस्वास्थ्यकर त्वचा असलेल्या लोकांसाठीही काळी गाजरं लाभदायक ठरतात.
The post लाल पेक्षाही अधिक गुणकारी असतात काळी गाजरं; शरीराला होतात ‘हे’ फायदे appeared first on पुढारी.
नवी दिल्ली : हिवाळा आला की बाजारात लालचुटूक गाजरंही दिसू लागतात. गाजरांचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक असते. मात्र, केवळ लालच गाजरं असतात असे नाही. काळीही गाजरे असतात व ती लाल गाजरापेक्षाही अधिक गुणकारी असतात हे तुम्हाला माहिती आहे का? ‘सायन्स डायरेक्ट’वर प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की काळ्या गाजरांमध्ये लाल आणि केशरी गाजरांपेक्षा जास्त फ्लेव्होनॉइडस् …
The post लाल पेक्षाही अधिक गुणकारी असतात काळी गाजरं; शरीराला होतात ‘हे’ फायदे appeared first on पुढारी.