Crime News : कार घासली म्हणुन झाला वाद आणि नंतर तरुणाचा खून
पुणे : रस्त्याने जाताना कारला दुसरी गाडी घासल्याने वाद झाला. त्यातूनच नुकसानभरपाई मागण्यासाठी आलेल्या तरुणाला सात ते आठ जणांनी धारदार शस्त्राने मारहाण करून त्याचा निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिषेक संजय भोसले (वय 30, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो फर्निचरचा व्यवसाय करत होता. याप्रकरणी, अभिषेक यांचा भाचा अथर्व दादासाहेब साबळे (वय 18,रा. शेवाळवाडी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विलास सकट (वय 31, रा. चंदवाडी, फुरसुंगी) याच्यासह 7 ते 8 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेतले आहे.
हा प्रकार फुरसुंगीतील चंदवाडी येथे मंगळवारी रात्री सव्वादहा वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक भोसले हे फर्निचरचे काम करतात़. ते स्विफ्ट गाडी घेऊन मंगळवारी सायंकाळी सहा वाजता शेवाळवाडी येथील महादेव मंदिराजवळून जात होते. त्यावेळी दुसरी गाडी येऊन त्यांच्या कारला घासली. यावरुन विलास सकट याच्याशी त्यांची वादावादी झाली. त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. नुकसान भरपाई घेण्यासाठी अभिषेक भोसले हे चंदवाडी येथे गेले असताना विकास सकट व इतर 7 ते 8 जणांनी त्यांच्या तोंडावर, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा खून केला. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एकाला ताब्यात घेतले असून आरोपींच्या शोधासाठी 2 पथके रवाना झाली.
हेही वाचा
Pune News : ‘पीएम आवास’मध्ये आढळले पाच भाडेकरू
पुणे लोकसभा पोटनिवडूक : ताकदीने उतरू अन् जिंकू काँग्रेस, भाजपचा दावा
सातारा : मातीत आर्थिक ‘माती’ खाण्याची प्रशासकीय लालसा
The post Crime News : कार घासली म्हणुन झाला वाद आणि नंतर तरुणाचा खून appeared first on पुढारी.
पुणे : रस्त्याने जाताना कारला दुसरी गाडी घासल्याने वाद झाला. त्यातूनच नुकसानभरपाई मागण्यासाठी आलेल्या तरुणाला सात ते आठ जणांनी धारदार शस्त्राने मारहाण करून त्याचा निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिषेक संजय भोसले (वय 30, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो फर्निचरचा व्यवसाय करत होता. याप्रकरणी, अभिषेक यांचा भाचा अथर्व …
The post Crime News : कार घासली म्हणुन झाला वाद आणि नंतर तरुणाचा खून appeared first on पुढारी.