इस्‍त्रायलने झुगारला जागतिक दबाव! पंतप्रधान नेतन्याहू म्‍हणाले, “युद्ध जिंकेपर्यंत…”

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : युद्धविरामासाठी जागतिक दबाव असूनही आम्‍ही हमासच्‍या दहशतवाद्यांविरुद्ध लढा देत राहू. युद्ध जिंकेपर्यंत आम्हाला गाझा पट्टीमध्ये युद्ध सुरू ठेवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्‍पष्‍ट केल्‍याचे वृत्त ‘एएफपी’ने दिले आहे. गाझामध्‍ये मानवतावादी युद्धविराम आणि सर्व ओलीसांची तात्काळ, बिनशर्त सुटका करण्याची मागणी करणारा ठराव संयुक्त राष्ट्र महासभेने मंगळवारी … The post इस्‍त्रायलने झुगारला जागतिक दबाव! पंतप्रधान नेतन्याहू म्‍हणाले, “युद्ध जिंकेपर्यंत…” appeared first on पुढारी.
#image_title
इस्‍त्रायलने झुगारला जागतिक दबाव! पंतप्रधान नेतन्याहू म्‍हणाले, “युद्ध जिंकेपर्यंत…”


पुढारी ऑनलाईन डेस्‍क : युद्धविरामासाठी जागतिक दबाव असूनही आम्‍ही हमासच्‍या दहशतवाद्यांविरुद्ध लढा देत राहू. युद्ध जिंकेपर्यंत आम्हाला गाझा पट्टीमध्ये युद्ध सुरू ठेवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्‍पष्‍ट केल्‍याचे वृत्त ‘एएफपी’ने दिले आहे. गाझामध्‍ये मानवतावादी युद्धविराम आणि सर्व ओलीसांची तात्काळ, बिनशर्त सुटका करण्याची मागणी करणारा ठराव संयुक्त राष्ट्र महासभेने मंगळवारी मंजूर केला होता. यानंतर नेतन्याहू यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.
लष्करी सुविधा केंद्राला भेट दिल्‍यानंतर बोलताना नेतन्‍याहू म्‍हणाले की, “युद्धविरामासाठी आमच्‍यावर आंतरराष्ट्रीय दबाव येत आहे. मात्र असा दबाव आम्‍हाला थांबवू शकत नाही. युद्ध जिंकेपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल. आम्हाला हे मिशन पूर्ण करण्याची गरज आहे.”

Here is the latest on the Israel-Hamas war:
➡️Israel’s Netanyahu says ‘nothing will stop us’
➡️Hamas chief says any post-war plan in Gaza without Hamas is ‘delusion’
➡️US, Britain impose new sanctions on Hamas.https://t.co/dYu8d3brpy pic.twitter.com/TfCmNTGV2n
— AFP News Agency (@AFP) December 13, 2023

Israel-Hamas War : गाझामध्‍ये १८ हजारांहून अधिक नागरिक ठार
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्‍या माहितीनसुसार, गाझामध्ये 18,400 हून अधिक लोक मारले गेले आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्‍या सर्वाधिक आहे. शहरातील 24 लाख लोकसंख्‍येपैकी 19 लाख लोक युद्धामुळे विस्थापित झाल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांने व्‍यक्‍त केला आहे.
आम्ही चर्चा करण्यास तयार : हमास प्रमुखाचा दावा
गाझा शहरात इस्रायलकडून सुरु असलेले हल्‍ले थांबवण्यासाठी आम्‍ही चर्चा करण्‍यास तयार आहोत, असे हमास प्रमुख इस्माइल हनीयेह यांनी म्‍हटले आहे की, “युद्धविरामासाठी पुढाकार घेण्‍याचीही आमची तयारी आहे. यामुळे वेस्ट बँक आणि गाझा पट्टी या दोन्ही ठिकाणी पॅलेस्टिनींना त्यांच्या घरी परतण्याचे दरवाजे खुले होतील.”
हेही वाचा : 

Israel-Hamas War : हमासच्या बोगद्यांत समुद्राचे पाणी सोडणार
Israel-Hamas War : एलॉन मस्क यांची मोठी घोषणा, गाझा, इस्रायलमधील रुग्णालयांना मदत
Israel-Hamas War News | इस्रायल-हमास युद्धात नागरिकांच्या मृत्यूचा तीव्र निषेध, संवादाने संघर्ष निवळू शकतो- पीएम मोदी

 
The post इस्‍त्रायलने झुगारला जागतिक दबाव! पंतप्रधान नेतन्याहू म्‍हणाले, “युद्ध जिंकेपर्यंत…” appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : युद्धविरामासाठी जागतिक दबाव असूनही आम्‍ही हमासच्‍या दहशतवाद्यांविरुद्ध लढा देत राहू. युद्ध जिंकेपर्यंत आम्हाला गाझा पट्टीमध्ये युद्ध सुरू ठेवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्‍पष्‍ट केल्‍याचे वृत्त ‘एएफपी’ने दिले आहे. गाझामध्‍ये मानवतावादी युद्धविराम आणि सर्व ओलीसांची तात्काळ, बिनशर्त सुटका करण्याची मागणी करणारा ठराव संयुक्त राष्ट्र महासभेने मंगळवारी …

The post इस्‍त्रायलने झुगारला जागतिक दबाव! पंतप्रधान नेतन्याहू म्‍हणाले, “युद्ध जिंकेपर्यंत…” appeared first on पुढारी.

Go to Source