नाशिक : पुढारी वृत्तसेवा– गंगापूर धरणावरील पंपिग स्टेशन तसेच मुकणे धरणावरील पंपिग स्टेशनचा विजपुरवठा महावितरण कंपनीकडून शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि. १६) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवारी (दि. १७) सकाळच्या सत्रातील शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागकडून देण्यात आली आहे.
नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण समूह तसेच मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गंगापुर धरण पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ के.व्ही. सातपुर व महिंद्रा या दोन फिडरवरुन ३३ के.व्ही. एच.टी. वीजपुरवठा घेणेत आलेला आहे. सदर पंपिंगद्वारे मनपाचे बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगीरीबाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्रांना पाणीपुरवठा केला जातो. नाशिक पश्चिम वितरण विभागास प्रभाग क्र.१२ मधील नविन जलधारा वसाहत येथील २० लक्ष लिटर जलकुंभास बाराबंगला जलशुध्दीकरण केंद्राचे आवारातुन जोडणी करणे, विसेमळा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ रोड १२०० मिलीमीटर पीएससी ग्रॅव्हीटी मेन रॉ वॉटर पाईपलाईन वरील पाणी गळती बंद करणे, शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथे एमबीआर लाईनवर फ्लो मीटर बसविणे व पाणीपुरवठा वितरण विभागातील विविध ठिकाणचे दुरुस्ती कामे शनिवारी हाती घेतली जाणार आहेत. तसेच मुकणे रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथुन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे.
सदरचे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये २२० केव्ही सीटी टेस्ट करणे, सर्व इनसुलेशन क्लिनिंग व इतर अनुषंगिक कामा करीता शनिवारी (दि. १६) सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विजपुरवठा खंडीत केला जाणार आहे. त्यामुळे गंगापुर धरण व मुकणे धरण येथुन सदर कालावधीत पाण्याचा उपसा करता येणार नसल्याने मनपाचे सर्व जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार आहेत. त्यामुळे शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवारी सकाळच्या सत्रातील पाणीपुरवठा देखील कमी राहणार असल्याचे मनपाने कळविले आहे.
हेही वाचा :
दुष्काळी पथकाला सांगली, सातारा दिसत नाही का? : आमदार विश्वजित कदम
Mohammed Shami : अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मह शमीच्या नावाची शिफारस
Pune News : ‘पीएम आवास’मध्ये आढळले पाच भाडेकरू
The post नाशिकमध्ये शनिवारी ‘पाणीबाणी’ तर रविवारीही… appeared first on पुढारी.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा– गंगापूर धरणावरील पंपिग स्टेशन तसेच मुकणे धरणावरील पंपिग स्टेशनचा विजपुरवठा महावितरण कंपनीकडून शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि. १६) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवारी (दि. १७) सकाळच्या सत्रातील शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागकडून देण्यात आली आहे. …
The post नाशिकमध्ये शनिवारी ‘पाणीबाणी’ तर रविवारीही… appeared first on पुढारी.