संसदेत घुसखोरी : आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संसदेचे सुरक्षा कडे भेदून संसदेत घुसरखोरी केल्‍याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यातील (UAPA ) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ( Parliament Security Breach ) संसद अधिवेशनादरम्यान तरुणांनी बुधवारी लोकसभेत घुसखोरी करून ‘तानाशाही नहीं चलेगी, लोकतंत्र बचाओ, काला कानून खतम करो,’ अशा घोषणा देत धुराचे नळकांडे फोडले. संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला बुधवारी … The post संसदेत घुसखोरी : आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल appeared first on पुढारी.
#image_title

संसदेत घुसखोरी : आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संसदेचे सुरक्षा कडे भेदून संसदेत घुसरखोरी केल्‍याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यातील (UAPA ) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ( Parliament Security Breach )
संसद अधिवेशनादरम्यान तरुणांनी बुधवारी लोकसभेत घुसखोरी करून ‘तानाशाही नहीं चलेगी, लोकतंत्र बचाओ, काला कानून खतम करो,’ अशा घोषणा देत धुराचे नळकांडे फोडले. संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला बुधवारी 22 वर्षे पूर्ण होत असताना, नव्या संसद भवनाच्या सुरक्षेला खिंडार पाडणार्‍या या घटनाक्रमामुळे सरकारसह सुरक्षा यंत्रणांची एकच तारांबळ उडाली. यामुळे संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेचे दावे फोल ठरले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एक तरुण आणि हरियाणातील एका तरुणीसह पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील एकजण फरारी आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली होती.
केंद्रीय गृह मंत्रालयानेही दिले चौकशीचे आदेश
केंद्रीय गृह मंत्रालयानेही संसदेच्‍या सुरक्षा भंग प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून हे आदेश देण्‍यात आले आहेत. अनिश दयाळ सिंग, DG, CRPF यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये इतर सुरक्षा संस्था आणि तज्ञ सदस्य आहेत,” गृहमंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे.
चौकशी समिती संसदेच्या सुरक्षेतील उल्लंघनाच्या कारणांची चौकशी करेल, त्रुटी ओळखून पुढील कारवाईची शिफारस करेल. समिती लवकरात लवकर संसदेतील सुरक्षा सुधारण्याच्या सूचनांसह शिफारशींसह आपला अहवाल सादर करेल,” असे मंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

Delhi Police registers case under UAPA, IPC in connection with Parliament security breach: Officials
— Press Trust of India (@PTI_News) December 14, 2023

 
The post संसदेत घुसखोरी : आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संसदेचे सुरक्षा कडे भेदून संसदेत घुसरखोरी केल्‍याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यातील (UAPA ) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ( Parliament Security Breach ) संसद अधिवेशनादरम्यान तरुणांनी बुधवारी लोकसभेत घुसखोरी करून ‘तानाशाही नहीं चलेगी, लोकतंत्र बचाओ, काला कानून खतम करो,’ अशा घोषणा देत धुराचे नळकांडे फोडले. संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला बुधवारी …

The post संसदेत घुसखोरी : आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Go to Source