पुणे लोकसभा पोटनिवडूक : 2013 मतदान केंद्रे निश्चित प्रशासकीय यंत्रणा तयार

पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा निवडणूक शाखेने यापूर्वीच तयारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे निवडणूक लागल्यास प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे बुधवारी प्रशासनाने स्पष्ट केले. पुणे मतदारसंघासाठी 2013 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय, 4140 बॅलेट युनिट, 4142 कंट्रोल युनिट आणि 4200 … The post पुणे लोकसभा पोटनिवडूक : 2013 मतदान केंद्रे निश्चित प्रशासकीय यंत्रणा तयार appeared first on पुढारी.
#image_title

पुणे लोकसभा पोटनिवडूक : 2013 मतदान केंद्रे निश्चित प्रशासकीय यंत्रणा तयार

पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा निवडणूक शाखेने यापूर्वीच तयारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे निवडणूक लागल्यास प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे बुधवारी प्रशासनाने स्पष्ट केले. पुणे मतदारसंघासाठी 2013 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय, 4140 बॅलेट युनिट, 4142 कंट्रोल युनिट आणि 4200 व्हीव्हीपॅट अशी मतदान यंत्रेही तयार आहेत.
मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात येणारी मतदारयादी वापरायची, की 5 जानेवारी 2023 रोजी तयार करण्यात आलेली यादी वापरायची याबाबत आयोगाकडून सूचना येईल, असे सांगण्यात आले. पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.’पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तयारी यापूर्वीच करण्यात आली आहे.
या मतदारसंघासाठी बॅलेट युनिट, कन्ट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट अशी मतदान यंत्रे तयार आहेत. या मतदान यंत्रांची तपासणीदेखील पूर्ण झालेली आहे. याशिवाय, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे आपसुकच पुणे लोकसभा मतदारसंघाची मतदान केंद्रे निश्चित झाली आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकी साठीची प्रारूप मतदारयादी 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, तर अंतिम मतदारयादी 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच पुण्याची पोटनिवडणूक जाहीर झाल्यास 5 जानेवारी 2023 रोजी जाहीर करण्यात आलेली मतदारयादी वापरावी लागणार आहे. याबाबत पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच अधिकृतपणे सांगता येईल.
मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुणे.

उपलब्ध मतदान यंत्रे

बॅलेट युनिट – 4140
कंट्रोल युनिट – 4142
व्हीव्हीपॅट – 4200
विधानसा मतदारसंघ
निहाय मतदान केंद्र
वडगाव शेरी – 452
शिवाजीनगर – 280
पुणे कॅन्टोन्मेंट – 272
कसबा पेठ – 270
कोथरूड – 393
पर्वती – 344

हेही वाचा

पुणे लोकसभा पोटनिवडूक : ताकदीने उतरू अन् जिंकू काँग्रेस, भाजपचा दावा
सातारा : मातीत आर्थिक ‘माती’ खाण्याची प्रशासकीय लालसा
तणावमुक्तीचे गुणात्मक पाऊल

The post पुणे लोकसभा पोटनिवडूक : 2013 मतदान केंद्रे निश्चित प्रशासकीय यंत्रणा तयार appeared first on पुढारी.

पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा निवडणूक शाखेने यापूर्वीच तयारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे निवडणूक लागल्यास प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे बुधवारी प्रशासनाने स्पष्ट केले. पुणे मतदारसंघासाठी 2013 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय, 4140 बॅलेट युनिट, 4142 कंट्रोल युनिट आणि 4200 …

The post पुणे लोकसभा पोटनिवडूक : 2013 मतदान केंद्रे निश्चित प्रशासकीय यंत्रणा तयार appeared first on पुढारी.

Go to Source