ब्रह्मांडात आढळला विशाल तरंगता जलाशय!

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : आजवर मानवाला माहीत असलेल्या ब्रह्मांडातील पाण्याचा सर्वात मोठा साठा हा पृथ्वीपासून 12 अब्ज प्रकाश वर्ष अंतरावर आहे. विशेष म्हणजे, हा साठा पृथ्वीवरील एकूण जलसाठ्याच्या 140 ट्रिलियन पट आहे! खगोलशास्त्रज्ञांच्या दोन चमूंनी मिळून हा तरंगता जलाशय शोधून काढला आहे. प्रशांत (पॅसिफिक) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे, असे आपण म्हणतो; पण पृथ्वीवर जेवढ्या … The post ब्रह्मांडात आढळला विशाल तरंगता जलाशय! appeared first on पुढारी.
#image_title

ब्रह्मांडात आढळला विशाल तरंगता जलाशय!

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : आजवर मानवाला माहीत असलेल्या ब्रह्मांडातील पाण्याचा सर्वात मोठा साठा हा पृथ्वीपासून 12 अब्ज प्रकाश वर्ष अंतरावर आहे. विशेष म्हणजे, हा साठा पृथ्वीवरील एकूण जलसाठ्याच्या 140 ट्रिलियन पट आहे!
खगोलशास्त्रज्ञांच्या दोन चमूंनी मिळून हा तरंगता जलाशय शोधून काढला आहे. प्रशांत (पॅसिफिक) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे, असे आपण म्हणतो; पण पृथ्वीवर जेवढ्या म्हणून नद्या, तलाव, सरोवरे आणि समुद्र वा महासागर आहेत, ते सगळे मिळूनही ब्रह्मांडात नव्याने आढळलेल्या या तरंगत्या जलाशयासमोर पाण्याचा एक थेंब आहेत, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही! ब्रह्मांडात अन्यत्रही जीवन असणार, ही जी कल्पना माणसात पूर्वांपार आहे, तिला या संशोधनाने आणखी बळ मिळाले आहे. ‘नासा’ आणि ‘इस्रो’सारख्या अंतराळ संशोधन संस्था अंतराळातील पाण्याच्या शोधावर कोट्यवधीचा खर्च करत आहेत आणि अशात, ‘क्वासर’ (एक विशालकाय ब्लॅक होल) लगत पाण्याचा हा विशालकाय ढग आढळणे, हे खगोल विज्ञानाचे एक मोठे यश आहे.
‘क्वासर’ सूर्याहून ऊर्जावान!
‘क्वासर’मधून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. वायू आणि धूळ या ‘ब्लॅक होल’च्या मध्यात कोसळते आणि विद्युत-चुंबकीय किरणोत्सर्ग होतो. आपल्या सूर्यापेक्षा हा ‘क्वासर’ 22 अब्ज पटींनी ऊर्जा निर्माण करतो.
पुढे काय?
खगोलशास्त्रज्ञांना या दूरच्या दुनियेबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे आणि त्यासाठी ते चिलीतील वाळवंटात भव्य टेलिस्कोप साकारू पाहत आहेत.

या प्रचंड अंतरावरील विशालकाय जलाशयाच्या शोधाने एक स्पष्ट झाले आहे, ते म्हणजे पाणी सर्वत्र आहे.
– मॅट ब्रॅडफोर्ड, जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळा, ‘नासा’, कॅलिफोर्निया

The post ब्रह्मांडात आढळला विशाल तरंगता जलाशय! appeared first on पुढारी.

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : आजवर मानवाला माहीत असलेल्या ब्रह्मांडातील पाण्याचा सर्वात मोठा साठा हा पृथ्वीपासून 12 अब्ज प्रकाश वर्ष अंतरावर आहे. विशेष म्हणजे, हा साठा पृथ्वीवरील एकूण जलसाठ्याच्या 140 ट्रिलियन पट आहे! खगोलशास्त्रज्ञांच्या दोन चमूंनी मिळून हा तरंगता जलाशय शोधून काढला आहे. प्रशांत (पॅसिफिक) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे, असे आपण म्हणतो; पण पृथ्वीवर जेवढ्या …

The post ब्रह्मांडात आढळला विशाल तरंगता जलाशय! appeared first on पुढारी.

Go to Source