सांगली : तरुणीचा फोटो ठेवून जादूटोणा

मिरज; पुढारी वृत्तसेवा : तरुणीचा फोटो ठेवून कोंबडा कापून, नारळ, लिंबू, हळद-कुंकू ठेवून जादूटोणा करण्यात आला. अमावास्येच्या रात्री मिरजेत हा प्रकार घडला. असे अघोरी कृत्य करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिरज-कोल्हापूर रस्त्यावर जुना हरिपूर रस्ता आहे. बुधवारी दुपारी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे विकास कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना … The post सांगली : तरुणीचा फोटो ठेवून जादूटोणा appeared first on पुढारी.
#image_title

सांगली : तरुणीचा फोटो ठेवून जादूटोणा

मिरज; पुढारी वृत्तसेवा : तरुणीचा फोटो ठेवून कोंबडा कापून, नारळ, लिंबू, हळद-कुंकू ठेवून जादूटोणा करण्यात आला. अमावास्येच्या रात्री मिरजेत हा प्रकार घडला. असे अघोरी कृत्य करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मिरज-कोल्हापूर रस्त्यावर जुना हरिपूर रस्ता आहे. बुधवारी दुपारी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे विकास कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला कापलेल्या कोंबड्याचे डोके, नारळ, लिंबू, हळद-कुंकू असे साहित्य पडलेले दिसले. याच साहित्याजवळ एका अनोळखी तरुणीचा फोटोही होता. हे साहित्य जिथे पडलेले होते त्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता.
थोरात यांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. मंगळवारी मध्यरात्री अमावास्येला दोघा दुचाकीस्वारांनी हा जादूटोण्याचा प्रकार केल्याचे दिसले. त्या दोघांनी दुचाकीवरून उतरून पिशवीतून साहित्य काढले व कोंबडा कापला आणि काही मिनिटातच ते तिथून निघून गेले. सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकाराची मिरज शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.
The post सांगली : तरुणीचा फोटो ठेवून जादूटोणा appeared first on पुढारी.

मिरज; पुढारी वृत्तसेवा : तरुणीचा फोटो ठेवून कोंबडा कापून, नारळ, लिंबू, हळद-कुंकू ठेवून जादूटोणा करण्यात आला. अमावास्येच्या रात्री मिरजेत हा प्रकार घडला. असे अघोरी कृत्य करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिरज-कोल्हापूर रस्त्यावर जुना हरिपूर रस्ता आहे. बुधवारी दुपारी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे विकास कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना …

The post सांगली : तरुणीचा फोटो ठेवून जादूटोणा appeared first on पुढारी.

Go to Source